IPL 2021: ...तेव्हा मुंबई साडेपाच ओव्हरमध्येच जिंकली होती; हे आहेत IPL मधील सर्वात झटपट झालेले ५ विजय

आयपीएल (IPL 2021)  ही टी-20 सामन्यांची स्पर्धा असली तरी कोलकाता नाईट रायडर्सने (KKR)  सोमवारचा सामना 10 षटकांतच संपवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 11:11 AM2021-09-21T11:11:01+5:302021-09-21T12:04:43+5:30

whatsapp join usJoin us
IPL: Mumbai won the match in 5.3 overs, these are the 5 instant wins of IPL | IPL 2021: ...तेव्हा मुंबई साडेपाच ओव्हरमध्येच जिंकली होती; हे आहेत IPL मधील सर्वात झटपट झालेले ५ विजय

IPL 2021: ...तेव्हा मुंबई साडेपाच ओव्हरमध्येच जिंकली होती; हे आहेत IPL मधील सर्वात झटपट झालेले ५ विजय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देअशाप्रकारे आयपीएलच्या इतिहासातील सर्वात कमी षटकात संघांनी जिंकलेले हे पहिले पाच सामने आहेत. त्यात किंग्ज इलेव्हन, आरसीबी व केकेआर ह्या तीन संघांनी झटपट सामना गमावलेला आहे तसा झटपट जिंकलेलासुध्दा आहे.  

ललित झांबरे

आयपीएल (IPL 2021)  ही टी-20 सामन्यांची स्पर्धा असली तरी कोलकाता नाईट रायडर्सने (KKR)  सोमवारचा सामना 10 षटकांतच संपवला. रॉयल चॅलेंजर्सला (RCB)  92 धावांतच गुंडाळल्यावर केकेआरने फक्त शुभमन गीलची विकेट गमावून 10 षटकांतच म्हणजे 60 चेंडू शिल्लक राखून विजय साजरा केला. आयपीएलमध्ये स्वतः आरसीबीने ह्याच्याआधी 71, 57 आणि 56 चेंडू शिल्लक राखून विजय फळ्यावर लावलेले आहेत पण सोमवारी आंद्रे रसेल व वरुण चक्रवर्तीच्या भेदकतेमुळे त्यांच्यावरच अशा मोठ्या पराभवाची नामुष्की ओढवली.  तरीही आयपीएलमध्ये सर्वात कमी षटकात पराभूत होण्याच्या लाजिरवाण्या विक्रमापासून ते बरेच पुढे आहेत.

1) मुंबईचा साडेपाच षटकांतच विजय

 योगायोग पाहा, सोमवारी ज्यांनी 10 षटके शिल्लक राखून सामना जिंकला त्याच केकेआरच्या नावावर सर्वात कमी षटकांत सामना गमावण्याचा आयपीएलचा नकोसा विक्रम आहे. 2008 मध्ये म्हणजे पहिल्याच आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने त्यांच्यावर केवळ साडेपाच षटकांतच विजय मिळवला होता. टारगेट होते 68 धावांचे आणि सनथ जयसूर्याच्या 17 चेंडूतील 48 धावांआधारे मुंबईने साडेपाच षटकातच सामना (87 चेंडू शिल्लक ठेवत)  जिंकला होता. केवळ 12 धावा देत 3 विकेट घेणारा शॉन पोलॉक सामनावीर ठरला होता. 

 

2) कोचीचा 7.2 षटकांतच विजय

2011 च्या आयपीएलमध्ये इंदूरच्या होळकर स्टेडियमवर कोची टस्कर्सने राजस्थान रॉयल्सवर 7.2 षटकांतच विजय मिळवला होता. त्यावेळी विजयी लक्ष्य होते 98 धावांचे. ब्रँड हॉजने फक्त 13 धावात 4 विकेट काढून रॉयल्सचा डाव 97 धावात गुंडाळला होता. नंतर तोच ब्रँड हॉज 17 चेंडूत नाबाद 33 धावा करून कोचीच्या झटपट विजयाचा शिल्पकार ठरला होता. सामनावीर कोण हा प्रश्नच नव्हता. 

 

3) किंग्ज इलेव्हनचा 7.5 षटकांत विजय

हे पहिले दोन सर्वात झटपट विजय 5.3 आणि 7.2 षटकांतच आले असेल तरी त्यात विजयी संघांनी प्रत्येकी दोन गडी गमावलेले होते पण 30 एप्रिल, 2017 रोजी मोहाली इथे किंग्ज इलेव्हनने केवळ साडेसात षटकांत सामना तर जिंकलाच पण एकही गडीसुध्दा गमावला नव्हता. 73 चेंडू आणि 10 च्या 10 गडी शिल्लक असा हा दणदणीत विजय होता. संदीप शर्माच्या 20 धावात 4 बळीच्या कामगिरीने दिल्ली डेअरडेव्हिल्सचा डाव 67 धावांतच संपविल्यावर मार्टिन गुप्तीलने 27 चेंडूतच 50 धावा करताना हाशीम आमलाच्या मदतीने 7.5 षटकातच सामना संपवला होता. सामनावीर संदीप  शर्मा होता. 

 

4) आरसीबीचा 8.1 षटकांतच विजय

2018 मध्ये इंदूरच्याच होळकर स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने असाच एकही गडी न गमावता 71 चेंडू  म्हणजे 11.5 षटके राखून किंग्ज इलेव्हनवर विजय साजरा केला होता. ह्यावेळी उमेश यादवने 23 धावात 3 गडी बाद केले आणि किंग्जच्या  तीन फलंदाजांनी धावबाद होत आरसीबीची मदतच केली.त्यानंतर विजयाचे 89 धावांचे लक्ष्य आरसीबीने 8.1 षटकांतच गाठले. सलामीला खेळलेला विराट कोहली 28 चेंडूत 48 आणि पार्थिव पटेल 22 चेंडूत 40 धावांवर नाबाद परतला. सामनावीर उमेश यादव ठरला. 

 

5) केकेआरचा 10 षटकांतच विजय

 71 चेंडू राखून 2018 मध्ये सामना जिंकलेल्या रॉयल चॅलेंजर्सला ताज्या सामन्यात मात्र 60 चेंडू शिल्लक असतानाच केकेआरकडून पराभव स्विकारावा लागला. अबू धाबीला वरुण चक्रवर्ती (3/13) व आंद्रे रसेल (3/9) यांनी रॉयल चॅलेंजर्सला 92 धावांवर गुंडाळले आणि नंतर शुभमन गिलच्या 48 व वेंकटेश अय्यरच्या 41 धावांआधारे केकेआरने 10 षटकांतच सामना जिंकला. सामनावीर वरुण चक्रवर्ती (Varun Chakravorthy) ठरला. 

अशाप्रकारे आयपीएलच्या इतिहासातील सर्वात कमी षटकात संघांनी जिंकलेले हे पहिले पाच सामने आहेत. त्यात किंग्ज इलेव्हन, आरसीबी व केकेआर ह्या तीन संघांनी झटपट सामना गमावलेला आहे तसा झटपट जिंकलेलासुध्दा आहे.  

इतर बातम्या : ‘ह्या’ व्यक्तीमुळेच सचिन तेंडूलकर एका क्षणात झाला सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू!
 

Web Title: IPL: Mumbai won the match in 5.3 overs, these are the 5 instant wins of IPL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.