Join us

IPL Opening Ceremony 2025 : शाहरूखनं आधी श्रेया घोषालला स्टेजवर बोलवलं; मग दिसला दिशा पाटनीचा तोरा

कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सह मालक शाहरुख खानच्या स्टेटवरील एन्ट्रीनं या रंगारंग कार्यक्रमाची सुरुवात झाली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 18:53 IST

Open in App

IPL Opening Ceremony 2025 : आयपीएल २०२५ स्पर्धेच्या १८ व्या हंगामाच्या सलामीच्या लढतीआधी ईडन गार्डन्सच्या मैदानात उद्घाटन सोहळ्यात बॉलिवूडकरांनी आपला जलवा दाखवला. कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सह मालक शाहरुख खानच्या स्टेजवरील एन्ट्रीनं या रंगारंग कार्यक्रमाची सुरुवात झाली. शाहरुख खान याने या कार्यक्रमात अँकरची भूमिका बजावल्याचे पाहायला मिळाले. 

आधी शाहरुख खानचा स्टायलिश अंदाज अन् मग श्रेया घोषालच्या परफॉमन्सनं झाली उद्घाटन सोहळ्याची सुरुवात

शाहरुखनं याने स्टेजवर ठुमके मारले नाही, पण त्याने आपल्या खास अंदाजातील डायलॉगबाजीसह उद्घाटन सोहळ्यात रंग भरला. गायिका श्रेया घोषाल हिच्या परफॉमन्सनं या कार्यक्रमाची सुरुवात होईल, याची घोषणाही शाहरुखनेच केली. श्रेया घोषाल हिच्या सादरिकरणानंतर दिशा पाटनी आणि बादशाह यांनी  चाहत्यांचे मनोरंन केल्याचे पाहायला मिळाले.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५कोलकाता नाईट रायडर्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरशाहरुख खानश्रेया घोषालदिशा पाटनी