कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे भारतीय क्रिकेटला यंदा उशीराने सुरुवात झाली. टी-२० वर्ल्डकपसह अनेक द्विपक्षीय मालिकाही रद्द किंवा स्थगित करण्यात आल्या. कोरोनाच्या परिस्थितीमुळेच यंदाची आयपीएल तब्बल ५ महिन्यांनी उशीराने आणि तेही यूएईमध्ये सुरु झाली. भारतातील कोरोनाची परिस्थिती आणखी बिकट होत असताना देशात आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन होणेही अत्यंत कठीण दिसत आहे. यामुळेच पुढील वर्षी होणाºया भारत-इंग्लंड मालिकेचे आयोजनही यूएईमध्ये होणार असल्याचे संकेत मिळत आहे. इतकंच नाही, तर कोरोनाची परिस्थिती अशीच राहीली तर काही महिन्यांनीच आयोजित होणाऱ्या आयपीएलच्या १४व्या पर्वाचे आयोजनही यूएईमध्येच होऊ शकते. ( IPL 2020 Live Updates, Click here)
शनिवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) संयुक्त अरब अमिरात क्रिकेट बोर्ड यांच्यत एक करार झाला. या करारामध्ये दोन्ही देशांच्या बोर्डातील संबंध अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. याविषयी बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी माहिती दिली की, ‘सध्यातरी यंदाच्या आयपीएलपर्यंतच बीसीसीआयने अरब अमिरात क्रिकेट बोर्डासह करार केला आहे.’ त्याचवेळी, बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील वर्षी होणारी भारत-इंग्लंड मालिका आणि पुढील आयपीएलचे आयोजनही यूएईमध्ये होण्याची शक्यता आहे. ( IPL 2020 Live Updates, Click here)
भारतात सध्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. जर परिस्थिती सुधारली नाही, तर नक्कीच भारताला इंग्लंडविरुद्धची मालिका अन्यत्र ठिकाणी खेळावी लागेल. त्याचवेळी, निर्धारीअ वेळापत्रकानुसार पुढील आयपीएलचे आयोजन करण्याचे झाल्यास बीसीसीआयकडे तयारीसाठी केवळ ३-४ महिन्यांचा कालावधी उरेल. त्यामुळेच वेळेची बचत करण्यासाठी आयपीएलचे पुढील पर्वही यूएईमध्ये आयोजित करण्यात येऊ शकते. ( IPL 2020 Live Updates, Click here)
अन्य महत्त्वाच्या बातम्या
संजय मांजरेकरने ओढावला नवा वाद; अंबाती रायुडू, पीयूष चावला यांना म्हणाला 'Low Profile' क्रिकेटपटू
ख्रिस गेलची विश्वविक्रमाडे वाटचाल; दिल्लीसमोर त्याला रोखण्याचे आव्हान
दिल्ली-पंजाब सामन्यात तीन मोठे विक्रम मोडणार; सुरेश रैनाला धक्का बसणार
IPL 2020 CSK : चेन्नई सुपर किंग्सचा स्टार अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो दुसऱ्या सामन्यालाही मुकणार