नवी दिल्ली : काही वर्षांपासून आयपीएलमध्ये चमकलेल्या खेळाडूंना भारतीय संघाचे दार खुले व्हायचे. सध्याच्या भारतीय संघातील बरेच खेळाडू हे आयपीएलमध्ये चमक दाखवून आलेले आहेत. पण आता मात्र निवड समितीने याबाबत 'यु टर्न' घेतला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये कितीही चांगली कामगिरी केली तरी भारतीय संघात स्थान मिळणार नाही, असे सुतोवाच भारताच्या निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी केले आहे.
आयपीएलनंतर विश्वचषक स्पर्धा होणार आहे. विश्वचषकासाठी अजूनही भारतीय संघाची निवड करण्यात आलेली नाही. त्यामुळे काही जणांना आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करून भारतीय संघात स्थान मिळवण्याची आशा होती. पण आता आयपीएमध्ये कितीही चांगली कामगिरी केली तरी त्या खेळाडूला विश्वचषकाच्या भारतीय संघात स्थान देता येणार नसल्याचे प्रसाद यांनी स्पष्ट केले आहे.
याबाबत प्रसाद यांनी सांगितले की, " यंदाच्या आयपीएलवर निवड समितीचे जास्त लक्ष नाही. कारण यंदाच्या आयपीएलचा विश्वचषकातील संघबांधणीवर कोणताही परीणाम होणार नाही. विश्वचषकासाठी कोणत्या खेळाडूंना संधी द्यायची हे आम्ही आयपीएल पाहून यंदा ठरवणार नाही."
वर्क लोडवर रोहितचं स्पष्ट मत; भारतीय संघातील खेळाडूंनाच निर्णय घेऊ द्या!
इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी भारतीय संघातील सदस्यांना पुरेशी विश्रांती मिळावी अशी मागणी होत आहे. त्यामुळे इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( आयपीएल 2019) भारताच्या प्रमुख खेळाडूंनी काही सामने विश्रांती घ्यावी, असे मत व्यक्त केले जात आहे. कर्णधार विराट कोहलीनं आयपीएलमध्ये विश्रांती करायची की नाही हा निर्णय प्रत्येक खेळाडूंनी स्वतःच्या तंदुरुस्तीनुसार घ्यावा, असा सल्ला दिला. उपकर्णधार रोहित शर्मानेही हेच मत व्यक्त केले, परंतु भारतीय संघातील बऱ्याच खेळाडूंना आयपीएलमध्ये विश्रांती नकोय, असेही रोहित म्हणाला.
वर्ल्ड कपस्पर्धेपूर्वी भारतीय संघातील खेळाडूंची तंदुरूस्ती ही बीसीसीआयसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये भारतीय संघातील खेळाडूंवरील कामाचा तणाव कमी व्हावा यासाठी बीसीसीआय संघमालकांशी चर्चा करणार आहे. खेळाडूंनीही राष्ट्रीय जबाबदारी लक्षात ठेवून आयपीएलमधील तणावाचा विचार करून खेळावे, अशा सूचना बीसीसीआयनं दिल्या आहेत. रोहितनं सांगितले की त्याच्यासह भारतीय संघातीन अन्य खेळाडूही दीर्घकालीन विचार करत आहेत आणि त्यानुसार गरज वाटेल तेव्हा ते विश्रांती घेणार आहेत.
तो म्हणाला,''गेले काही वर्ष आम्ही सातत्यानं क्रिकेट खेळत आहोत. त्यामुळे आपले शरीर काय सांगते याचा विचार करायला हवा. जर मला विश्रांती घ्यावीशी वाटली, तर ती मी घेणार. जगातील सर्वात मोठ्या लीगमध्ये खेळण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. त्यामुळे आम्हाला आमचे प्राधान्य माहित आहे.''
Web Title: IPL performance will not consider for selecting Indian squad!
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.