आयपीएलच्या सहाव्या पर्वात स्पॉट फिक्सिंग प्रकरणात सहभागी झालेला राजस्थान रॉयल्सचा माजी खेळाडू अजित चंदिलावर एका फळ विक्रेताने 7.5 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप करत कोतवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
फळ विक्रेता मशकूर यांनी आरोप करत म्हणटले की, माझा मुलगा फरीदाबादमध्ये क्रिकेटचे प्रशिक्षण घेत असल्यामुळे तिकडे अनेकदा जायचो, त्यावेळी अजित चंडेला सोबत भेट झाली होती. काही दिवसांनंतर चंडीलाने मुलाची निवड भारतीय अंडर -14 संघात करण्यात येईल असे सांगत फळ व्यापारी मशकूर यांच्याकडे 7.5 लाखांची मागणी केली.
त्यानंतर मशकूर यांनी गेल्या 24 डिसेंबर 2018मध्ये चंडीलाला 7.5 लाख रुपये दिले. परंतु त्यांच्या मुलाची संघात निवड न झाल्यामुळे देण्यात आलेली रक्कम पुन्हा मागितल्यानंतर चंदीलाने यावर्षी मार्च महिन्यात सात लाखांचा धनादेश दिला आणि दोन महिन्यांत पन्नास हजार रुपये रोख देण्याचे आश्वासन दिले. मात्र फळ विक्रेत्याने बॅंकेच्या खात्यात धनादेश जमा केल्यानंतर बाऊन्स झाल्याचे सांगत अखेर फळ विक्रेता याने चंडीलाविरुद्ध कोतवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
आयपीएलच्या सहाव्या पर्वातील स्पॉट फिक्सिंग प्रकरणात सहभागी झालेला राजस्थान रॉयल्सचा माजी खेळाडू अजित चंदिलावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) तीन सदस्यांच्या शिस्तपालन समितीने आजीवन बंदी घालण्याचा निर्णय घेतला, तर मुंबईच्या हिकेन शाहवर पाच वर्षांची बंदी घातली. बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यांच्या शिस्तपालन समितीने हा निर्णय घेतला होता.