Join us  

IPL playoffs: ७-७चं लक, ९-२-११ चा योगायोग, धोनीने खेळला असा डाव, इतर संघांना दिला धोबीपछाड

IPL playoffs: महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपरकिंग्सने पुन्हा एकदा आयपीएलच्या प्लेऑफमध्ये धडक दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2023 11:54 AM

Open in App

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपरकिंग्सने पुन्हा एकदा आयपीएलच्या प्लेऑफमध्ये धडक दिली आहे. चेन्नईने शनिवारी आयपीएलच्या गटसाखळीतील शेवटचा सामना दिल्ली कॅपिटल्सच्या संघाविरुद्ध खेळला. तेव्हा त्याच्यासोबत ९-२-११ चा योगायोग साथ देत होता. कर्णधार धोनीचं ७-७चं भाग्य ऐनवेळी असं काही चमकलं की, चेन्नई सुपरकिंग्सचा संघ थेट प्लेऑफमध्ये जाऊन पोहोचला. लखनौ सुपरजायंट्सच्या संघानेही अंतिम ४ संघात स्थान मिळवलं आहे. अशा परिस्थितीत शेवटच्या स्थानासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात बेरीज वजाबाकीची चुरस आहे.

आता तुम्ही म्हणाल हे नेमके योगायोग काय आहेत, तर ते पाहुयात. आयपीएलमध्ये सर्वाधिक ट्रॉफी मुंबई इंडियन्सने जिंकल्या आहेत. मात्र सर्वाधिकवेळा फायनलमध्ये खेळण्याचा विक्रम चेन्नई सुपरकिंग्सच्या नावावार आहे. २००८ पासून २०२२ पर्यंतच्या १५ हंगामांपैकी १३ हंगामात चेन्नईचा संघ आयपीएलमध्ये खेळला आहे. त्यापैकी ९ वेळा चेन्नई सुपरकिंग्सने आयपीएलची अंतिम फेरी गाठली आहे. २०१६  आणि १७ मध्ये बंदीमुळे ते आयपीएल खेळले नव्हते.

तर प्लेऑफचा विचार केल्यास गेल्या १५ वर्षांत चेन्नईचा संघ एकूण ११ वेळा प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. हा आयपीएलमध्ये एक विक्रम आहे. यावेळी आयपीएलच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी चेन्नई सुपरकिंग्सच्या संघाल २ गुणांची गरज होती. ९ वेळा फायनल खेळल्याचा आत्मविश्वास आणि ११ वेळा प्लेऑफमध्ये पोहोचल्याचा अनुभव यादरम्यान, चेन्नईला दिल्लीविरुद्धच्या सामन्यातून २ गुणांची गरज होती. ९-२-११ च्या या योगायोगाने चेन्नईचा संघ आयपीएलच्या ट्रॉफीच्या अगदी जवळ पोहोचला आहे.

दरम्यान, दिल्लीविरोधात हा विजय आणि विक्रम १२व्यांदा प्लेऑफमध्ये पोहोचण्यामागे चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या ७-७च्या लक फॅक्टरनेही काम केलं आहे. धोनीची जन्मतारीख ७ जुलै आहे. म्हणजेच ७ तारीख आणि सातवा महिना, तसेच धोनीच्या जर्सीचा नंबरही ७ आहे. चेन्नईने दिल्लीला या सामन्यातही ७७ धावांनीच पराभूत केलं. अशा प्रकारे धोनीचा लकी ७ आकडा चेन्नईच्या विजयासाठी भाग्यवान ठरला.  

टॅग्स :आयपीएल २०२३महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्सटी-20 क्रिकेट
Open in App