IPL Points Table Update: आयपीएलच्या 16व्या हंगामात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ची चमकदार कामगिरी सातत्याने पाहायला मिळत आहे. चेन्नईने त्यांच्या घरच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध 7 गडी राखून शानदार विजय नोंदवला. सीएसकेचा या मोसमातील 6व्या सामन्यातील हा चौथा विजय होता. त्यामुळे आता गुणतालिकेत ते 8 गुणांसह आणि नेट रन रेट 0.355 सह तिसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत. पहिल्या दोन स्थानांवर अनुक्रमे राजस्थान आणि लखनौच्या संघाने कब्जा केला आहे.
पहिल्या तीन संघांचे समान गुण
सध्या, पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर राजस्थान रॉयल्सचा (RR) संघ आहे. त्यांनी या हंगामात आतापर्यंत 6 पैकी 4 सामने जिंकले आहेत. राजस्थान संघाचा नेट रनरेट 1.043 आहे. गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर लखनौ सुपर जायंट्स (LSG) संघ आहे. त्यांचेही 6 सामन्यांत 8 गुण आहेत आणि नेट रनरेट 0.709 आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाचेही समान गुण आहेत, पण नेट रनरेटमुळे त्यांना तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले आहे.
गुणतालिकेत सध्या 4 संघांचे 6 गुण आहेत
गुणतालिकेत गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्जचे सध्या 6 गुण आहेत. ज्यामध्ये गुजरातचा संघ चौथ्या स्थानावर आहे, तर चांगल्या नेट रनरेटमुळे आरसीबी पाचव्या स्थानावर आहे. यानंतर मुंबई इंडियन्स सहाव्या तर पंजाब किंग्ज संघ सातव्या स्थानावर आहे.
हे आहेत 'बॉटम ३'
शेवटच्या तीन स्थानांबद्दल बोलायचे झाल्यास, कोलकाता नाईट रायडर्सचा संघ 8 व्या स्थानावर आहे, जो 6 पैकी फक्त 2 सामने जिंकू शकला. कोलकाताचा नेट रनरेट सध्या ०.२१४ आहे. यानंतर सनरायझर्स हैदराबाद संघ 4 गुणांसह 9व्या स्थानावर आहे तर दिल्ली कॅपिटल्स संघ 2 गुणांसह शेवटच्या स्थानावर आहे.