अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात राजस्थान रॉयल्सने बलाढ्य चेन्नई सुपरकिंग्जचे आव्हान ३ धावांनी नमवले. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर राजस्थानने २० षटकांत ८ बाद १७५ धावा केल्या. त्यानंतर त्यांनी चेन्नईला २० षटकांत ६ बाद १७२ धावांमध्ये रोखले. चेन्नईचा लोकल बॉय रविचंद्रन अश्विनचा अष्टपैलू खेळ सीएसकेला भारी पडला.
१ चेंडू ५ धावा, स्ट्राइकवर MS धोनी; अखेरच्या क्षणी संदीप शर्माचा तो निर्णय अन् राजस्थानचा विजय
राजस्थानने चेन्नईविरुद्ध विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थानी कब्जा केला. एकुण ४ सामन्यात ३ विजय मिळवत ६ गुणांसह राजस्थान आता गुणतालिकेत अवल्ल स्थानी आहे. तर लखनऊ सुपर जायट्स ६ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. राजस्थानला नेट रनरेट चांगला असल्याचा फायदा झाला आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर कोलकता नाइट रायडर्स असून चौथ्या क्रमांकावर गुजरात टायटन्स आहे.
माही मार रहा है....; व्ह्यूवरशिपच्या यादीत धोनीचा जलवा, जिओ सिनेमावर केला रेकॉर्डब्रेक
राजस्थानविरुद्धच्या पराभवानंतर चेन्नई सुपर किंग्सची पाचव्या स्थानी घसरण झाली आहे. तर सहाव्या स्थानी पंजाब किंग्स आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सातव्या स्थानी असून मुंबई इंडियन्सचा संघ आठव्या स्थानी आहे. सनराईस हैद्राबाद नवव्या क्रमांकावर असून दिल्ली कॅपिटल्स संघ सगळ्यात शेवटी म्हणजे दहाव्या स्थानी आहे.
दरम्यान, शेवटच्या दोन षटकांमध्ये ४० धावांची गरज असताना महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजा यांनी चेन्नईला विजयाच्या उंबरठ्यावर आणले होते. दोघांनी सातव्या गड्यासाठी ३० चेंडूंत नाबाद ४९ धावांची वादळी भागीदारी केली. परंतु अखेरच्या षटकात २१ धावांची गरज असताना दोघांना १७ धावाच काढता आल्या. विशेष म्हणजे या निर्णायक षटकात वेगवान गोलंदाज संदीप शर्माने पहिले दोन चेंडू वाईड टाकले, परंतु त्यानंतरही संदीपने राजस्थानने विजय खेचून आणला.
Web Title: IPL Points Table: Rajasthan Royals climb at the top of the IPL 2023 table
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.