जगातील सर्वात श्रीमंत आणि लोकप्रिय क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामाला सुरुवात झाली आहे. आयपीएलमध्ये जगभरातील एकापेक्षा एक धुरंधर खेळाडू सहभागी होत असतात. आयपीएलमधील सामन्यांत दररोज चौकार, षटकारांची बरसात होत असते. मात्र आयपीएलमध्ये खेळलेल्या फलंदाजांपैकी तीन दिग्गज फलंदाज असे आहेत ज्यांना या टी-२० लीगमध्ये एकही षटकार खेचता आलेला नाही. हे तीन खेळाडू पुढीलप्रमाणे.
१- मायकेल क्लार्क
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्क आयपीएलमध्ये एकही षटकार खेचू शकलेला नाही. मायकेल क्लार्क ऑस्ट्रेलियाकडून कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० सामने खेळला आहे. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५३ आणि टी-२० मध्ये १० आणि कसोटी क्रिकेटमध्ये ३९ षटकार खेचले आहेत. मात्र मायकेल क्लार्कला आयपीएलमध्ये एकही षटकार खेचता आलेला नाही. मायकेल क्लार्क आयपीएलमध्ये फारसा खेळला नाही. तो आयपीएलमध्ये ६ सामने खेळला. मात्र त्यामध्ये त्याला एकही षटकार खेचता आलेला नाही.
२ - आकाश चोप्रा
सध्या क्रिकेक सामन्यांदरम्यान समालोचकाच्या भूमिकेत दिसणारा आकाश चोप्रा हा सावध फलंदाजीसाठी ओळखला जायचा. आकाश चोप्रा आयपीएलमध्ये मोजकेच सामने खेळला. मात्र त्यामध्ये त्याला एकही षटकार खेचता आलेला नाही. तसेच भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही त्याला एकही षटकार खेचता आलेला नाही. आकाश चोप्रा आयपीएलमध्ये ७ सामने खेळला होता. मात्र त्याला त्यात कमाल दाखवता आली नाही. मात्प प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये १६२ सामने खेळताना त्याने ४५.३५ च्या सरासरीने १० हजार ८३९ धावा काढल्या.
३- शोएब मलिक
या यादीतील तिसरं नाव आहे ते पाकिस्तानचा दिग्गज फलंदाज शोएब मलिक याचं. शोएब मलिकने ५१० टी-२० सामन्यांमध्ये १२ हजार ५३८ धावा कुटल्या आहेत. मात्र आयपीएलमध्ये त्याला एकही षटकार मारत आलेला नाही. शोएब मलिक आयपीएलमध्ये ७ सामने खेळला होता. मात्र त्याला एकदाही चेंडू सीमापार भिरकावता आला नाही. शोएब मलिक २००८ मध्ये झालेल्या पहिल्या आयपीएलमध्ये खेळला होता. त्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यास मनाई करण्यात आली होती.
Web Title: IPL Records: Legendary batsmen who could not hit a single six in IPL, two of them will be shocked
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.