किंग्स इलेव्हन पंजाबनं ( Kings XI Punjab) अखेर महत्त्वाचा निर्णय घेताला. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल ( Glenn Maxwell) याला त्यांनी करारमुक्त केले. इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४ व्या पर्वासाठी संघानं काही महत्त्वाचे निर्णय घेतले. यूएईत झालेल्या आयपीएलच्या १३व्या पर्वात KXIPला पहिल्या टप्प्यात चांगली कामगिरी करता आली नव्हती, परंतु दुसऱ्या टप्प्यात ख्रिस गेलच्या समावेशानंतर पंजाबनं मोठी मजल मारली. मात्र, त्यांना प्ले ऑफ मध्ये प्रवेश मिळवता आला नाही. त्यांनी १४ पैकी ६ सामने जिंकले. त्या पर्वात मॅक्सवेलचा फॉर्म हा फार चर्चीला गेला होता. त्यानं १३ सामन्यांत केवळ १०८ धावा केल्या आणि तेव्हाच त्याची गच्छंती होणार, हे निश्चित मानले जात होते.
KXIP Retained: लोकेश राहुल, ख्रिस गेल, निकोलस पूरन, ख्रिस जॉर्डन, मोहम्मद शमी, मनदीप सिंग, मयांक अग्रवाल, रवी बिश्नोई, प्रभसिमरन सिंग, दीपक हूडा, सर्फराज खान, अर्षदीप सिंग, मुरुगन अश्विन, दर्शन नळकांडे, इशान पोरेल व हरप्रीत सिंग
Released: ग्लेन मॅक्सवेल, शेल्डन कोट्रेल, के गौथम, मुजीब उर रहमान, जिमी निशॅम, हार्डस विलजोन, करून नायर
RCBनं कायम राखलेले खेळाडू - विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, देवदत्त पडीक्कल, मोहम्मद सिराज, केन रिचर्डसन, वॉशिंग्टन सुंदर, पवन देशपांडे, जो फिलिप, एस अहमद, नवदीप सैनी, अॅडम झम्पा
रिलीज केलेले खेळाडू - जी सिंग, मोईन अली, अॅरोन फिंच, ख्रिस मॉरिस, पवन नेगी, शिवम दुबे, उमेश यादव, डेल स्टेन, पार्थिव पटेल, इसुरू उडाना