नवी दिल्ली : संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागून राहिलेल्या आयपीएल रिटेंशनची यादी अखेर गुरुवारी संध्याकाळी जाहीर झाली. रोहित शर्मा मुंबईत कायम राहणार की दुसऱ्या संघाकडून खेळणार, हा प्रश्न चाहत्यांना कित्येक दिवसांपासून सतावत होता. मुंबईने त्याला संघात कायम ठेवत, या चर्चांना पूर्णविराम दिला. त्याच वेळी, मुंबईचे कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे कायम ठेवण्यात आले.
रिंकूसाठी दिवाळी बोनस आयपीएलमध्ये आपल्या तडाखेबंद फटकेबाजीने सर्वांना प्रभावित करणाऱ्या रिंकू सिंगने रिटेंशन प्रकियेद्वारे घसघशीत कमाई केली आहे. त्याला गेल्या वर्षी कोलकाताकडून ५५ लाख रुपयांचे मानधन मिळत होते. रिटेंशनद्वारे मात्र आता त्याला कोलकाताकडून तब्बल १३ कोटींचे मानधन मिळेल.
पंजाबने ठेवले दोनच खेळाडू कायमऋषभ पंत, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, फाफ डूप्लेसिस या स्टार कर्णधारांचा लिलावात समावेश होणार. पंजाब संघाने केवळ दोन खेळाडू कायम ठेवले.कोलकाता, राजस्थान या संघांनी सर्व सहा खेळाडू कायम ठेवल्याने त्यांना आरटीएम कार्डचा वापर करता येणार नाही.महेंद्रसिंग धोनी आगामी सत्रातही खेळणार असल्याचे स्पष्ट झाले असून तो चेन्नईचा अनकॅप्ड खेळाडू म्हणून केवळ ४ कोटी रुपयांमध्ये खेळेल.
रिटेन झालेले खेळाडूमुंबई : हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, तिलक वर्मा.गुजरात : शुभमन गिल, राशीद खान, साई सुदर्शन, शाहरुख खान, राहुल तेवतिया.चेन्नई : ऋतुराज गायकवाड, मथिशा पथिराना, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी.हैदराबाद : पॅट कमिन्स, हेन्रीक क्लासेन, अभिषेक शर्मा, ट्रॅविस हेड, नितीशकुमार रेड्डी. बंगळुरू : विराट कोहली, रजत पाटीदार, यश दयाल.दिल्ली : अक्षर पटेल, कुलदीप यादव, ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल.कोलकाता : सुनील नरेन, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्थी, हर्षित राणा, रमनदीप सिंग.पंजाब : शशांक सिंग, प्रभसिमरन सिंग.राजस्थान : संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, संदीप शर्मालखनौ : निकोलस पूरन, मयांक यादव, रवी बिश्नोई, आयुष बदोनी, मोहसीन खान.