इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वापूर्वी चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) काही टफ कॉल घेतले आहे. यूएईत झालेल्या आयपीएल २०२०तील निराशाजनक कामगिरीनंतर संघात बरेच बदल अपेक्षित होते आणि त्या दृष्टीनं फ्रँचायझीनं मोठे निर्णय घेतले. हरभजन सिंग ( Harbhajan Singh), केदार जाधव, पीयूष चावला, मुरली विजय, शेन वॉटसन व मोनू सिंग यांना रिलीज केले गेले आहे. सुरेश रैनाला ( Suresh Raina) संघात कायम ठेवले गेले आहे.
राजस्थान रॉयल्सनं ( Rajasthan Royals) कर्णधार स्टीव्ह स्मिथला ( Steve Smith) आणि मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) लसिथ मलिंगाला ( Lasith Malinga) रिलीज करण्याचा निर्णय घेतला. विराट कोहलीच्या ( Virat Kohli) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore ) संघानं १२ तगड्या खेळाडूंना कायम राखले आहे.
चेन्नई सुपर किंग्सनं ( CSK) संघात कायम राखलेले खेळाडू ( Retained CSK players) - एन जगदीसन, ऋतुराज गायकवाड, के आसीफ, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी, जोश हेझलवूड, कर्ण शर्मा, अंबाती रायुडू, सुरेश रैना, इम्रान ताहीर, दीपक चहर, फॅफ ड्यू प्लेसिस, शार्दूल ठाकूर, मिचेल सँटनर, ड्वेन ब्राव्हो, लुंगी एनगीडी, सॅम कुरण, एक किशोरे Released: केदार जाधव, पीयूष चावला, मुरली विजय, हरभजन सिंग, शेन वॉटसन, मोनू सिंग
कोणाकडे किती रक्कम शिल्लकचेन्नई सुपर किंग्स ( CSK) - १५ लाख मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) - १.९५ कोटी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Channel Bangalore ) - ६.४ कोटी कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders) - ८.५ कोटीदिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) - ९ कोटी किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) - १६.५ कोटीसनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) - १०.१ कोटी राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) - १४.७५ कोटी
RCBनं कायम राखलेले खेळाडू - विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, देवदत्त पडीक्कल, मोहम्मद सिराज, केन रिचर्डसन, वॉशिंग्टन सुंदर, पवन देशपांडे, जो फिलिप, एस अहमद, नवदीप सैनी, अॅडम झम्पा रिलीज केलेले खेळाडू - जी सिंग, मोईन अली, अॅरोन फिंच, ख्रिस मॉरिस, पवन नेगी, शिवम दुबे, उमेश यादव, डेल स्टेन, पार्थिव पटेल, इसुरू उडाना