IPL retention: व्यंकटेश अय्यर, उमरान मलिक एका रात्रीत बनले कोट्यधीश, एका सत्राच्या जोरावर केली घसघशीत कमाई

IPL retention: आयपीएलच्या आगामी लिलाव प्रक्रियेआधी झालेल्या रिटेनशनमध्ये युवा खेळाडूंनी चांगलाच भाव खाल्ला. तसेच, आतापर्यंत सर्वाधिक कमाई घेणाऱ्या विराट कोहलीने यावेळी दोन कोटी रुपये कमी घेण्याची तयारी दाखवली.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 08:17 AM2021-12-02T08:17:54+5:302021-12-02T08:33:03+5:30

whatsapp join usJoin us
IPL retention: Venkatesh Iyer, Umran Malik become billionaires overnight | IPL retention: व्यंकटेश अय्यर, उमरान मलिक एका रात्रीत बनले कोट्यधीश, एका सत्राच्या जोरावर केली घसघशीत कमाई

IPL retention: व्यंकटेश अय्यर, उमरान मलिक एका रात्रीत बनले कोट्यधीश, एका सत्राच्या जोरावर केली घसघशीत कमाई

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : आयपीएलच्या आगामी लिलाव प्रक्रियेआधी झालेल्या रिटेनशनमध्ये युवा खेळाडूंनी चांगलाच भाव खाल्ला. यामध्ये कोलकाता नाइट रायडर्सचा व्यंकटेश अय्यर आणि सनरायझर्स हैदराबादचा उमरान मलिक या युवा खेळाडूंनी तब्बल ३९०० टक्क्यांनी घसघसीत कमाई करीत सर्वांचे लक्ष वेधले. तसेच, आतापर्यंत सर्वाधिक कमाई घेणाऱ्या विराट कोहलीने यावेळी दोन कोटी रुपये कमी घेण्याची तयारी दाखवली.
२०१८ साली आयकॉन खेळाडू म्हणून कोहलीने सर्वाधिक १७ कोटी रुपये मानधन मिळविले होते. मंगळवारी झालेल्या रिटेनशन प्रक्रियेतून त्याने १५ कोटी रुपयांवर समाधान मानण्याची तयारी केली. कोहलीने स्वत:हून आपले मानधन कमी केल्याचीही चर्चा रंगत आहे. आयपीएल रिटेनशनमधील अशाच काही महत्त्वाच्या घडामोडींवर टाकलेली ही नजर.

व्यंकटेश, मलिक यांना ३९००% वाढ! 
- गेल्या सत्रात केकेआरने व्यंकटेश अय्यरला केवळ २० लाख रुपयांमध्ये घेतले होते. आता मात्र त्याला रिटेन करताना केकेआरने त्याच्यासाठी तब्बल ८ कोटी रुपये मोजले. 
-सनरायझर्स हैदराबादनेही केवळ १० लाख रुपयांमध्ये घेतलेल्या उमरान मलिकसाठी यावेळी ४ कोटी रुपयांची किंमत मोजली. यासह या दोन्ही खेळाडूंच्या कमाईत प्रत्येकी ३९०० टक्क्यांनी घसघसीत कमाई केली.

मेगा ऑक्शनमधील आकर्षण...
 - आठ फ्रेंचायझींनी एकूण २७ खेळाडूंना कायम ठेवले. अन्य खेळाडू लिलावात उपलब्ध असतील. 
- मेगा लिलावात २१ असे खेळाडू आहेत, ज्यांना रिटेनशनमध्ये एकाही संघाने घेतलेले नाही. 
- यामध्ये हार्दिक पांड्या, राशिद खान, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, डेव्हिड वॉर्नर, जोफ्रा आर्चर, युजवेंद्र चहल, दीपक चाहर, बेन स्टोक्स, शार्दुल ठाकूर, रविचंद्रन अश्विन, कॅगिसो रबाडा, शिखर धवन, ईशान किशन, भुवनेश्वर कुमार, जॉनी बेयरस्टो, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्युसन, दिनेश कार्तिक, सुरेश रैना आणि मोहम्मद शमी यांचा समावेश आहे.

जडेजा धोनीवर भारी
रवींद्र जडेजा सीएसकेचा अव्वल खेळाडू बनला. त्याला १६ कोटी रुपये मिळाले. १२ कोटींसह धोनी दुसऱ्या स्थानावर आला. हा निर्णय स्वत: धोनीनेच घेतल्याची माहिती आहे. धोनी २०२२ नंतर खेळणार नाही, अशावेळी रवींद्र जडेजा हाच सीएसकेचा पुढचा कर्णधार असेल.

या जोडींची होणार ताटातूट
२०२२ च्या आयपीएल सत्रात काही प्रसिद्ध आणि लोकप्रिय खेळाडू सोबत खेळताना दिसणार का? त्यात आरसीबीचे विराट कोहली- एबी डिव्हिलयर्स यांचा वरचा क्रम लागतो. याशिवाय महेंद्रसिंग धोनी- सुरेश रैना हे सीएसकेचे अनुभवी खेळाडू, मुंबईचे किरोन पोलार्ड- हार्दिक पांड्या तसेच पंजाबचे मयंक अग्रवाल- लोकेश राहुल यांच्याबाबतही उत्सुकता असेल.

व्यंकटेशपेक्षा नरेन स्वस्त
केकेआरचा फिरकीपटू सुनील नरेन याला केवळ सहा कोटींत संघात रिटेन करण्यात आले. त्याच्यापेक्षा अधिक रक्कम वरुण चक्रवर्ती आणि व्यंकटेश अय्यर (८-८ कोटी) यांना मिळाली.

नोर्खियाला पृथ्वीपेक्षा कमी रक्कम
द. आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एन्रिच नोर्खिया हा मागच्या दोन सत्रांपासून आयपीएल खेळत आहे. २०१९ साली तो बदली खेळाडू म्हणून आला. यानंतर त्याने दिल्ली कॅपिटल्स संघाचा मुख्य गोलंदाज म्हणून ओळख निर्माण केली. अशावेळी त्याला केवळ ६.५ कोटी मिळाले याचे आश्चर्य वाटते. त्याच्यापेक्षा अधिक रक्कम पृथ्वी शॉला (७.५ कोटी) मिळाली. 
 

Web Title: IPL retention: Venkatesh Iyer, Umran Malik become billionaires overnight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.