Yashasvi Jaiswal Record : आयपीएलच्या १८ व्या हंगामातील कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यातील यशस्वी जैस्वालवर सर्वांच्या नजरा होत्या. पहिल्यांदा फलंदाजी करण्याची वेळ आल्यावर त्याने अपेक्षेप्रमाणे फटकेबाी केली. पण चांगल्या सुरुवातीनंतर तो पुन्हा एकदा अल्प धावसंख्येवर अडखळला. सेट झाला असताना २९ धावांवर त्याने आपली विकेट गमावली. पण या छोट्याखानी खेळीतही त्याने एक मोठा डाव साधला आहे. कोलकाता विरुद्धच्या सामन्यात २१ धावा करताच यशस्वी जैस्वाल याने टी-२० कारकिर्दीत ३००० धावांचा पल्ला गाठला. या कामगिरीसह खास क्लबमध्ये एन्ट्री मारताना त्याने शुबमन गिललाही मागे टाकले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
गिलला मागे टाकण्याचा 'यशस्वी' डाव
भारताच्या युवा सलामीवीराने टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात ३००० धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत शुबमन गिलला मागे टाकले आहे. यशस्वीनं १०२ डावात हा पल्ला गाठला आहे. टीम इंडियाचा प्रिन्स आणि आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स संघाचे नेतृत्व करणाऱ्या शुबमन गिलने हा टप्पा पार करण्यासाठी १०३ डाव खेळले होते. टी-२० त यशस्वी जैस्वालच्या खात्यात आता एकूण ३००८ धावा जमा असून यातील ७२३ धावा त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये काढल्या आहेत.
IPL 2025: राहुल द्रविड बरोबर दिसणारी 'ही' तरूणी कोण? राजस्थान रॉयल्सशी कनेक्शन काय?
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलदगतीने ३०० धावा करणारे भारतीय फलंदाज
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलदगतीने ३००० धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिलक वर्मा हा सर्वात आघाडीवर आहेत. त्याने फक्त ९० डावात हा पल्ला गाठण्याचा रेकॉर्ड आहे. त्याच्यापाठोपाठ या यादीत ऋतुराज गायकवाड (९१ डाव), केएल राहुल (९३ डाव) यांचा नंबर लागतो. त्यानंतर यशस्वी जैस्वाल (१०२ डाव) आणि शुबमन गिल (१०३) चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत.
आयपीएलमधील पहिल्या दोन सामन्यात फ्लॉप शो
इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या दोन सामन्यात यशस्वी जैस्वालला लौकिकाला साजेसा खेळ करता आलेला नाही. पहिल्या दोन सामन्यानंतर त्याच्या खात्यात फक्त ३० धावा जमा आहेत. यशस्वी जैस्वालच्या टी २० कारकिर्दीबद्दल बोलायचे तर त्याने आतापर्यंत १०६ सामन्यात १७ अर्धशतकासह ३ शतके ठोकली आहेत. राजस्थानच्या ताफ्यातील तो प्रमुख खेळाडू असून तो लयीत येणं संघासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. आगामी सामन्यात तरी तो आपला तोरा दाखवणार का? ते पाहण्याजोगे असेल.