IPL: शुभमन गिलला मेन्शन करत सचिनचं मजेशीर ट्विट, मुंबई जिंकल्याचा 'विराट' आनंद

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला प्ले ऑफसाठी आजचा सामना जिंकणे महत्त्वाचे होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 09:52 AM2023-05-22T09:52:28+5:302023-05-22T09:59:15+5:30

whatsapp join usJoin us
IPL: Sachin Tendulkar's funny tweet mentioning Shubman Gill, Virat Anand of winning Gujarat and play off for mumbai indians | IPL: शुभमन गिलला मेन्शन करत सचिनचं मजेशीर ट्विट, मुंबई जिंकल्याचा 'विराट' आनंद

IPL: शुभमन गिलला मेन्शन करत सचिनचं मजेशीर ट्विट, मुंबई जिंकल्याचा 'विराट' आनंद

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई - क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ म्हटलं जातं, सामन्यात कधी कोणाची बाजी पलटेल आणि पराभवाच्या छायेत असेलला संघ जिंकण्याचा आनंद साजरा करेल याचा काही नेम नसतो. आयपीएल प्ले ऑफमधील प्रवेशासाठी आयपीएल संघांमध्ये अत्यंत चुरस सुरू होती. त्यातच, काही संघांचं स्थान केवळ खेळाच्याच नाही तर नशिबाच्याही भरवशावर होतं. याच दोन्ही सांगड घालत मुंबई इंडियन्सने आपला प्ले ऑफमधील प्रवेश निश्चित केला आहे. त्याला, गुजरात टायटन्सचा विजय त्यास कारणीभूत ठरला. त्यामुळेच, मास्टरब्लास्टर आणि मुंबई इंडियन्सचा मेंटॉर सचिन तेंडुलकरने मजेशीर ट्विट केलं आहे. 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला प्ले ऑफसाठी आजचा सामना जिंकणे महत्त्वाचे होते. विशेष म्हणजे कर्णधार विराट कोहलीने जबरदस्त शतक ठोकले, संघाने १९८ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य उभंही केलं. पण, शुबमन (१०४) व विजय शंकर यांनी RCBच्या मेहनतीवर पाणी फिरवले. गुजरातने रोमहर्षक विजय मिळवला अन् RCBचे पॅक अप झाले. गुजरातच्या विजयाने मुंबई इंडियन्स मात्र चौथ्या सीटवरून प्ले ऑफमध्ये पोहोचले. मुंबईच्या या विजयाचा मुंबईकरांसह मुंबई इंडियन्सच्या सर्वच चाहत्यांना अत्यानंद झाला आहे. मुंबईकडून कॅमेरॉन ग्रीननेही केवळ ४७ चेंडूत तुफानी शतक पूर्ण केले. 

सचिन तेंडुलकरने या विजयाचा आपल्याला अत्यानंद झाल्याचे म्हटले. तसेच, मजेशीर ट्विट करत शुभमन गील आमि कॅमेरॉन ग्रीनच्या खेळीचं कौतुकही केलं. ''कॅमेरॉन आणि शुभमन यांनी मुंबई इंडियन्ससाठी उत्तम फलंदाजी केली'', असे सचिनने म्हटले. यासोबत डोळा मारुन हसलेला इमोजीही शेअर केला आहे. विराटने बॅक टू बॅक दुसरे शतक ठोकले हे, खरंच अमेझिंग असल्याचेही सचिनने म्हटले. त्यासह, मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये पोहोचल्याचा मला सर्वाधिक आनंद झाल्याचंही मास्टरब्लास्टर म्हणाला. 

दरम्यान, आता, GT vs CSK यांच्यात क्वालिफायर १ चा सामना २३ मे रोजी चेन्नईतील चेपॉकवर होणार आहे, तर, २४ मे रोजी MI vs LSG अशी एलिमिनेटर लढत होईल.
 

Web Title: IPL: Sachin Tendulkar's funny tweet mentioning Shubman Gill, Virat Anand of winning Gujarat and play off for mumbai indians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.