CSK vs KKR Opening Game of IPL 2022 : इंडियन प्रीमिअर लीगचे १५ वे पर्व २६ मार्च ते २९ मे, २०२२ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. मुंबई आणि पुणे येथील चार आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्टेडियम्सवर साखळी फेरीचे ७० सामने खेळवण्यात येणार आहेत. आयपीएल महाराष्ट्रात खेळवण्यात येणार हे निश्चित झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारनेही हालचाली सुरू केल्या आहेत. आयपीएलचा सलामीचा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स ( Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders) यांच्यात होणार आहे. CSK vs KKR हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर २६ मार्चला खेळवण्यात येईल. IPL 2022 Full Schedule
गतविजेत्या संघा ला पहिला सामना खेळण्याचा मान देण्याची परंपरा आयपीएलने कायम राखली आहे. मागच्या पर्वात CSKने अंतिम सामन्यात कोलकाताचा पराभव केला होता. ''CSK vs KKR यांच्या लढतीने आयपीएल २०२२ ची सुरुवात होणार आहे. गतविजेत्यांना सलामीचा सामना खेळण्याचा पहिला मान देण्याचा नियम कायम राखला आहे. सुरुवातीच्या सामन्यांना २५ टक्के प्रेक्षकक्षमतेला मान्यता देण्याचा विचार आहे,''अशी माहिती बीसीसीआयच्या सीनियर अधिकाऱ्याने InsideSport ला सांगितले.
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स आणि प्रथमच श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणारा कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातला सामना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. मुंबई आणि पुणे येथील चार आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्टेडियम्सवर साखळी फेरीचे ७० सामने खेळवण्यात येणार आहेत. वानखेडे व डी वाय पाटील स्टेडियम्सवर प्रत्येकी २०, तर ब्रेबॉर्न व गहुंजे स्टेडियमवर प्रत्येकी १५ सामने खेळवले जातील. प्रत्येक संघ प्रत्येकी चार सामने वानखेडे स्टेडियम व डी वाय पाटील स्टेडियमवर खेळतील, प्रत्येक संघ प्रत्येकी तीन सामने ब्रेबॉर्न स्टेडियमवर आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे येथे खेळेल. प्रत्येक संघ गटातील चार आणि दुसऱ्या गटातील एक अशा पाच संघांशी दोनवेळा आणि उर्वरित चार संघांशी एक वेळा खेळेल.
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे वांद्रे-कुर्ला संकुल येथील मैदान आणि ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर फ्रँचायझींना सराव करण्यासाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक रविवारी किंवा सोमवारी जाहीर केले जाईल, महाराष्ट्र सरकारने सर्व मदत करण्याची तयारी दर्शवल्याचे बीसीसीआय खजिनदार अरुण धुमाळ यांनी सांगितले. बीसीसीआयच्या काही सदस्यांनी शनिवारी पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी भेट घेतली. मुंबईच्या वाहतुक कोंडीतून खेळाडूंची सुटका होण्यासाठी त्यांच्यासाठी स्वतंत्र मार्गिकेची सोय देण्याचे आश्वासन महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आल्याची बातमी इंडियन एक्स्प्रेसने प्रसिद्ध केली आहे.
Web Title: IPL Season 15 to open with Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders match at Wankhede on March 26
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.