आयपीएलमध्ये आपल्या स्फोटक अंदाजाने लक्षवेधून घेणारा शाहरुख खानच्या केकेआरच्या ताफ्यातील स्टार क्रिकेटरला गंभीर दुखापत झाली आहे. अफगाणिस्तानचा क्रिकेटर रहमनुल्लाह गुरबाझ याला प्रॅक्टिस सेशनवेळी मानेवर चेंडू लागला. या घटनेनंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. शपगीजा क्रिकेट लीगमध्ये सहभागी असलेल्या या स्टार खेळाडूची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजते. चाहते त्याने लवकर बरे व्हावे, अशी प्रार्थनाही करत आहेत.
टी २0 वर्ल्ड कपस्पर्धेत आपल्या संघासाठी ठरला होता हिरो
गुरबाझ याने अफगानिस्तान संघाकडून ६३ टी-२०, ४० वनडे आणि एक कसोटी सामना खेळला आहे. अफगानिस्तानच्या संघाला टी-२० वर्ल्ड कप २०२४ च्या सेमीफायनलपर्यंत पोहचवण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती.
IPL मध्ये शाहरुखच्या KKR साठी दिला हिट शो
रहमनुल्लाह गुरबाझ आयपीएलमध्ये कोलकाता नाइटरायडर्सच्या ताफ्यातून खेळताना दिसला होता. शाहरुख खानच्या मालकीच्या संघात त्याच्यावर डावावा सुरुवात करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. २०२३ मध्ये या फ्रँचायझी संघाकडून पहिला सामना खेळणाऱ्या गुरबाजनं या हंगामात ११ सामन्यात २ अर्धशतकांसह २२७ धावा काढल्या होत्या. २०२४ च्या हंगामातही तो केकेआर संघाचा भाग होता. पण यावेळी फिल सॉल्टच्या दमदार कामगिरीमुळे त्याला फक्त दोन सामन्यात संधी मिळाली होती.
आयपीएल पॅटर्नमधील अफगाणिस्तानमधील टी-२० लीगबद्दल
अफगाणिस्तानमध्ये आयपीएलची तुफान लोकप्रियता आहे. याच स्पर्धेच्या धर्तीवर अनेक देशात टी-२० लीग स्पर्धा रंगल्याचे पाहायला मिळते. अफगाणिस्तानमध्ये हाच पॅटर्न शपगीजा लीगच्या रुपात सुरु करण्यात आला आहे. शपगीजा या शब्दाचा अर्थ सिक्सर असा होता. २०१३ पासून भरवण्यात येणाऱ्या या स्पर्धेत 'बंद-ए-आमिर ड्रॅगन्स, स्पिन घर टायगर्स , एमो शार्क्स, मिस एनक नाइट्स, बूस्ट डिफेंडर्स, एमो शार्क्स असे सहा संघ खेळतात. यंदाच्या हंगामाची सुरुवात ही १२ ऑगस्टपासून झाली आहे. या स्पर्धेतील फायनल सामना २४ ऑगस्टला रंगणार आहे.
Web Title: IPL Star And Afghanistan Cricketer Rahmanullah Garbaz Was Injured After Being Hit On The Neck By A Ball
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.