IPL Hit Moments: आयपीएलचं सध्या १४ वं सत्र सुरू आहे. जगभरातील दिग्गज खेळाडू आयपीएलमध्ये खेळत आहेत आणि आपल्या जबरदस्त खेळीनं सामन्याची उत्कंठा वाढवत आहेत. गेल्या १४ सत्रांमध्ये स्पर्धेचा स्तर उंचावत गेला आहे. जगातील सर्वात लोकप्रिय टी-२० लीग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयपीएलच्या पहिल्या सत्राची सुरुवात आजच्याच दिवशी २००८ साली झाली होती. 'बाळाचे पाय पाळण्यात दिसतात', अशी एक म्हण आहे. आयपीएलचंही तसंच काहीसं झालं होतं असंच म्हणावं लागेल. कारण पहिल्याच सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सचा तडाखेबाद फलंदाज ब्रेंडन मॅक्युलम यानं ७३ चेंडूत १५८ धावांची वादळी खेळी साकारली होती. मॅक्युलमच्या या वादळी खेळीनं आयपीएलचा पाया रचला गेला आणि गेल्या १३ वर्षांत आयपीएलनं अनेक रेकॉर्ड, रोमांच आणि थरारक अनुभ क्रिकेट चाहत्यांना दिला आहे.
बाबो!; जॉनी बेअरस्टोनं असा SIX मारला की फ्रिजच्या काचा फुटल्या, Video
बीसीसीआयचे माजी उपाध्यक्ष ललित मोदी यांच्या संकल्पनेतून आयपीएलची सुरुवात झाली होती. पहिल्याच लिलावात भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. त्यावेळी धोनीवर साडेसहा कोटींची बोली लावण्यात आली होती.
ब्रायन लाराला भारताच्या 'या' युवा क्रिकेटपटूचं आयपीएलमध्ये शतक झालेलं पाहायचंय, झालाय मोठा फॅन!
आयपीएलच्या लिलावानंतर १८ एप्रिल २००८ रोजी बंगळुरूमध्ये पहिला सामना खेळवला गेला. शाहरुखन खानच्या कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध विजय माल्याची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू असा सामना होता. कोलकातानं प्रथम फलंदाजी केली आणि पहिल्याच सामन्यात मॅक्युलमनं आपले मनसुबे स्पष्ट केले होते. सौरव गांगुली आणि ब्रेंडन मॅक्युलमनं कोलकातासाठी ओपनिंग केली.
IPL मधून निवृत्ती घेतलेल्यांची Playing XI पाहिलीत का?, गंभीर कॅप्टन, तर सचिन सलामीवीर!
आयपीएल स्पर्धेचा पहिला चौकार मॅक्युलमनं झहीर खानच्या गोलंदाजीवर लगावला होता. त्यानंतर सामन्याच चौकार आणि षटकारांचा नुसता पाऊस पडला. पावर प्लेच्या पहिल्या ६ षटकांमध्ये ६१ धावा केल्या. यात तर ५० धावा पहिल्या चार षटकांमध्येच पूर्ण झाल्या होत्या. मॅक्युलमनं ३२ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं होतं.
अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर मॅक्युलमनं फलंदाजीचा टॉप स्पीड गिअर टाकला आणि वादळ निर्माण केलं. ५१ ते १०० धावांचा टप्पा त्यानं अवघ्या १९ चेंडूत पूर्ण केला. अवघ्या ७० चेंडूत १० चौकार आणि १२ खणखणीत षटकारांच्या मदतीनं मॅक्युलमनं १५० धावांचा आकडा गाठला. पुन्हा एकदा अवघ्या १९ चेंडूत त्यानं १०१ ते १५० धावांपर्यंतचा टप्पा पूर्ण केला होता.
महेंद्रसिंग धोनीला एका २८ वर्षीय खेळाडूनं मोठ्या संकटातून वाचवलं, नाहीतर...
केकेआरनं २० षटकांच्या अखेरीस तीन विकेट्च्या मोबदल्यात २२२ धावा केल्या होत्या. यातील १५८ धावा तर एकट्या मॅक्युलमनं केल्या होत्या. मॅक्युलम नाबाद राहिला. त्यानं सामन्यात १० खणखणीत चौकार आणि तब्बल १३ उत्तुंग षटकार लगावले होते.
राहुल द्रविडच्या नेतृत्वाखालील आरसीबीचा मानहानीकारक पराभवकेकेआरच्या डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीची केविलवाणी अवस्था झाली होती. आरसीबीचं नेतृत्व राहुल द्रविड करत होता. आरसीबीचा संपूर्ण संघ १५.१ षटकांमध्ये अवघ्या ८२ धावांवर गारद झाला. केकेआरकडून अजित आगरकरनं सर्वाधित तीन बळी घेतले. तर अशोक दिंडा आणि सौरव गांगुली यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतले.