मुंबई: आयपीएल 11 मधील प्ले ऑफचं चित्र स्पष्ट झालं आहे. दिल्ली डेअरडेविल्सनं मुंबई इंडियन्सचा, तर चेन्नई सुपर किंग्सनं पंजाबचा पराभव केल्यानं प्ले ऑफमधील चार संघ स्पष्ट झाले आहेत. सनरायजर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स गुणतालिकेत पहिल्या दोन स्थानांवर आहेत. तर कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्सचे संघ अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी आहेत. साखळी सामन्यांनंतर महेंद्रसिंग धोनीचा चेन्नई सुपर किंग्स संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. आयपीएलच्या मागील 10 हंगामांचा विचार केल्यास, गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघानं सर्वाधिकवेळा स्पर्धा जिंकली आहे. स्पर्धेचा आतापर्यंतचा इतिहास लक्षात घेतल्या, गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर असलेला संघ पाचवेळा विजेता ठरला आहे. तर चौथ्या क्रमांकावर असलेला संघ फक्त एकदा जेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरला आहे. 2011 ते 2015 या कालावधीत आयपीएल गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर असलेले संघ विजेते ठरले आहेत. 2011: चेन्नई सुपर किंग्स2012: कोलकाता नाइट राइडर्स2013: मुंबई इंडियन्स2014: कोलकाता नाईट राइडर्स2015: मुंबई इंडियन्स
साखळी सामन्यांनंतर गुणतालिकेत पहिलं स्थान पटकावणाऱ्या संघांनी स्पर्धेचं जेतेपद पटकावलं, असं आतापर्यंत दोनदा घडलं आहे. 2008: राजस्थान रॉयल्स2017: मुंबई इंडियन्स
गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर असलेल्या संघांनी आतापर्यंत दोनदा स्पर्धा जिंकण्याची कामगिरी साधली आहे. 2010: चेन्नई सुपर किंग्स2016: सनरायजर्स हैदराबाद
गुणतालिकेत चौथ्या स्थानी असलेल्या संघानं स्पर्धा जिंकण्याची किमया फक्त एकदा साधली आहे. 2009: डेक्कन चार्जर्स