इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल) ही सध्याच्या घडीची जगातील सर्वोत्तम ट्वेंटी-20 लीग आहे आणि त्यात कोणाचेही दुमत नसेल. पण, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावजन्य संबंध पाहता, या लीगमध्ये पाक खेळाडूंना खेळण्याची परवानगी नाकारण्यात आलेली आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये खेळता येत नसल्याची खंत त्यांना नक्की वाटत असेल. आयपीएलच्या धर्तीवर त्यांनी पाकिस्तान सुपर लीगची सुरुवात केली खरी, पण त्याला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे आयपीएलमध्ये खेळण्याचे स्वप्न आजही अनेक पाकिस्तानी खेळाडू बाळगुन आहेत.
... तर आशिया कप खेळणार नाही, पाकच्या इशाऱ्याला बीसीसीआयचे जशासतसे उत्तर
पाकिस्तानचा गोलंदाज सोहैल तन्वीर यानं तरी ही लीग जगात सर्वात भारी असल्याचे मत व्यक्त केले. आयपीएलच्या पहिल्या मोसमात तन्वीर राजस्थान रॉयल्सकडून खेळला होता. त्यामुळे त्याला आयपीएलचा करिष्मा चांगलाच माहित आहे. म्हणून आयपीएल ही जगातील सर्वोत्तम ट्वेंटी-20 लीग असल्याचं मत त्यानं व्यक्त केलं. पण, या लीगमध्ये पाक खेळाडूंना खेळता येत नसल्याची खंतही त्यानं व्यक्त केली.
तन्वीरनं त्याला सुरुवातीचा काळ गाजवला. पाकिस्तान क्रिकेटचा तो उगवता तारा असल्याचं भाकित अनेकांनी केलं होतं, परंतु त्याला सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. 2017मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध त्यानं अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. त्यानं आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व करताना 2008-09चा हंगामही गाजवला होता. पाकिस्तान सुपर लीगमध्ये त्यानं 2019मध्ये क्युएट्टा ग्लॅडीएटर संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
तो म्हणाला,''माझ्यासह अन्य पाकिस्तानी खेळाडूंच्या मनात आयपीएलमध्ये खेळता येत नसल्याची खंत आहे. ही जगातील सर्वोत्तम लीग आहे. त्यामुळे कोणत्याही खेळाडूला यात न खेळावेसे वाटणार नाही.''
आशिया कप आणि वर्ल्ड कप खेळण्याचे लक्ष्यतन्वीर म्हणाला,''पाकिस्तान संघाकडून अजूनही मला खेळण्याची संधी मिळेल आणि आशिया कप व ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी बोलावणं येईल, अशी अपेक्षा आहे. त्यानंतर पुढील वर्षी भारतात ट्वेंटी-20 वर्ल्ड कप होणार आहे. निवड समितीनं बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत मोहम्मद हाफिज व शोएब मलिक यांना संधी दिल्यानं माझ्याही आशा पल्लवीत झाल्या आहेत.''
IND vs NZ : टीम इंडियाविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी न्यूझीलंडचा तगडा संघ जाहीर
IND Vs NZ, 3rd T20I : टीम इंडियाच्या 'Super' विजयावर बिग बी अन् वीरूचं खास ट्विट
Video : न्यूझीलंड संघाची खिलाडूवृत्ती; जखमी प्रतिस्पर्धी फलंदाजाला उचलून नेलं मैदानाबाहेर
Video: कोबे ब्रायंट हेलिकॉप्टरने का जात होता?; कारण वाचून डोळ्यात अश्रू तरळतील!
OMG : असा चमत्कार पुन्हा होणे नाही; 32 चेंडूंत 1 धाव अन् 7 विकेट्स, पाहा Video
टीम इंडियाच्या 'या' सुंदरीची सोशल मीडियावर चर्चा... कोण आहे ती?