Join us  

ठरलं! आता तब्बल अडीच महिने रंगणार IPL चा थरार, BCCIच्या मागणीचा ICCने ठेवला मान

पाकिस्तानच्या PSL अन् इतर T20 लीग स्पर्धांनाही ICC कडून दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 4:17 PM

Open in App

IPL window in ICC FTP 2023-27 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धा आता पुढील वर्षापासून दोन नव्हे तर अडीच महिने खेळवली जाणार आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आपल्या फ्युचर टूर प्रोग्राममध्ये (FTP) IPL साठी अडीच महिन्यांचा कालावधी निश्चित केला आहे. म्हणजेच आता भारतीय क्रिकेट चाहत्यांना रोमहर्षक सामने अधिक काळ पाहायला मिळणार आहेत. एका अहवालाच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार दरवर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून ते जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत IPL साठी अडीच महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. २५ आणि २६ जुलै रोजी बर्मिंगहॅममध्ये ICC ची वार्षिक बैठक होणार आहे. त्या दरम्यान FTP म्हणजे फ्युचर टूर प्रोग्रॅमची (आगामी कार्यक्रम) औपचारिक घोषणा केली जाईल.

व्यस्त वेळापत्रकांमुळे खेळाडूंची होणार दमछाक!

IPL सहित सर्वच देशांच्या टी२० स्पर्धांना न्याय देण्याच्या दृष्टीने ICC ने काही निर्णय घेतले आहेत. अहवालानुसार, ICC च्या 2023-2027 FTP मध्ये दोन जागतिक कसोटी चॅम्पियनशिप, ICC T20 आणि ODI विश्वचषका व्यतिरिक्त इतर देशांच्या मालिकांचा समावेश आहे. या दरम्यान, खेळाडूंना खूप कमी विश्रांती मिळेल. कारण इतर टी२० लीग स्पर्धांमुळे वेळापत्रक खूपच व्यस्त असणार आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ( BCCI) सचिव जय शाह यांनी आधीच सांगितले होते की, आता अडीच महिन्यांचे आयपीएल आयोजित केले जाईल. पुढील तीन वर्षे प्रत्येक हंगामात १०-१० सामने वाढवले ​​जातील. त्यानुसार अडीच महिन्यांची विंडो IPL ला देण्याची विनंती ICCकडे करण्यात आली होती.

पुढील तीन हंगामात असा असू शकेल 'आयपीएल'चा कार्यक्रम-

- दर दोन वर्षांनी किमान १० सामने वाढवण्याची योजना- IPL 2023 आणि IPL 2024 मध्ये १० संघांमध्ये ६० ऐवजी ७४ सामने- IPL 2025 आणि IPL 2026 मध्ये १० सामने वाढवून एकूण सामने ८४ होतील- यानंतर IPL 2027 पासून प्रत्येक आयपीएल हंगामात तब्बल ९४ सामन्यांची शक्यता

पाकिस्तानच्या PSL सह इतर T20 लीग स्पर्धांनाही दिलासा

ICC ने FTP मध्ये पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि बांगलादेश या सर्व देशांना दिलासा दिला आहे. जेव्हा पाकिस्तान सुपर लीग (PSL), ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग (BBL), बांगलादेश प्रीमियर लीग (BPL), कॅरेबियन प्रीमियर लीग (CPL) आणि 'द हंड्रेड' स्पर्धा इंग्लंडमध्ये खेळल्या जातील, तेव्हा यापैकी कोणतीही देश आंतरराष्ट्रीय मालिका खेळत नसेल असे प्लॅनिंग करण्यात आले आहे.

टॅग्स :आयपीएल २०२२आयसीसीबीसीसीआयपाकिस्तान
Open in App