इंडियन प्रीमिअर लीगच्या 2020 आगामी मोसमात बरेच बदल पाहायला मिळणार आहे. नो बॉलवर आता तिसऱ्या अंपायरची नजर असणार आहे, तर बदली खेळाडूला फलंदाजी व गोलंदाजी करता येणार आहे. पण, आयपीएलच्या नियमांप्रमाणे काही संघ त्यांच्या नावातही बदल करण्याच्या तयारीला लागले आहेत. गतमोसमात दिल्ली डेअरडेव्हील्स संघानं त्यांचं नाव बदलून दिल्ली कॅपिटल्स असं केलं होतं. यंदा रॉयल चॅलेंजर बंगळुरू त्यांच्या पावलावर पाऊल टाकणार आहेत. RCB नं तसे संकेत सोशल मीडियावर दिले आहेत.
बुधवारी RCBनं त्यांच्या ट्विटर, इस्टाग्राम आणि फेसबुक अकाऊंटवरील प्रोफाईल फोटो म्हणून ठेवलेला लोगो अचानक काढला. शिवाय त्यांनी RCBहे नाव न ठेवता केवळ रॉयल चॅलेंजर्स असंच ठेवल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार RCBत्यांच्या नावात ‘Bangalore’ याऐवजी आता ‘Bengaluru’ असं लिहीणार आहे आणि 16 फेब्रुवारीला याची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. आता नावात बदल केल्यानंतर तरी RCBचं नशीब उजळणार का, असा सवाल नेटिझन्स विचारत आहेत.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली RCBला अजून एकदाही जेतेपद पटकावता आलेले नाही. त्यामुळे यंदाच्या मोसमात कर्णधारपदाची जबाबदारी दुसऱ्या खेळाडूकडे सोपवण्यात येईल अशीच चर्चा रंगली होती. पण, नवीन नियुक्त करण्यात आलेले क्रिकेट संचालक माईक हेसन यांनी ही शक्यता खोडून काढली. कोहलीसह, एबी डिव्हिलियर्स आणि ख्रिस गेल हे ट्वेंटी-20 स्पेशालिस्ट संघात असूनही RCBच्या जेतेपदाची पाटी कोरीच राहिली आहे.
IPL2020 संघानं कायम राखलेले खेळाडू विराट कोहली, मोईन अली, युजवेंद्र चहल, एबी डिव्हिलियर्स, पार्थिव पटेल, मोहम्मद सीराज, पवन नेगी, उमेश यादव, गुरुकीरत मान, देवदत्त पड्डीकल, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनीलिलावात ताफ्यात दाखल करून घेतलेले खेळाडूअॅरोन फिंच ( 4.4 कोटी), ख्रिस मॉरिस ( 10 कोटी), जोशूआ फिलीप ( 20 लाख), केन रिचर्डसन ( 4 कोटी), पवन देशपांडे ( 20 लाख), डेल स्टेन ( 2 कोटी), शाहबाझ अहमद ( 20 लाख), इसूरु उदाना ( 50 लाख)
आयपीएल 2020त बदल; पाच डबलहेडर, बारावा खेळाडू अन् बरंच काही...
युवा वर्ल्ड कप गाजवणारे 'हे' शिलेदार आता IPL 2020 मध्ये कमाल दाखवणार
Kings XI Punjabला धक्का, प्रमुख खेळाडू IPL 2020च्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार
Breaking : Jasprit Bumrahनं गमावलं वन डे क्रमवारीतील अव्वल स्थान; फलंदाजांमध्ये मोठा बदल
आयपीएल 2020च्या आधीच Hardik Pandya पुनरागमन करणार, जाणून घ्या कधी व कुठे खेळणार
ट्वेंटी-२०तील शेर वन डेत का झाले ढेर?; खरंच Virat Kohliच्या प्राधान्यक्रमावर ही मालिका नव्हतीच
नेपाळनं वन डे क्रिकेटमध्ये इतिहास रचला; अमेरिकेच्या फलंदाजांची शरणागती
INDvBAN, U19WCFinal: भारतीय खेळाडूंवर बीसीसीआय कारवाई करणार? माजी कर्णधारांची मागणी