जमैकाचा महान धावपटू उसेन बोल्टला वाढदिवसाची पार्टी चांगलीच महागात पडली आहे. बोल्टला कोरोनाची लागण झाली आहे. उसेनचा 21 ऑगस्टला वाढदिवस होता. बोल्टने पार्टीनंतर कोरेनाची चाचणी केली, यानंतर तो पॉझिटिव्ह असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे, धक्कादायक म्हणजे या पार्टीची धग आता आयपीएललाही बसणार असून क्रिकेटर ख्रिस गेल (Chris Gayle) या पार्टीला हजर होता.
उसेन बोल्टच्या पार्टीला फुटबॉलर रहीम स्टर्लिंग आणि लियॉन बैली देखील आले होते. याशिवाय अन्य बड्या हस्तीदेखील उपस्थित होत्या. बोल्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्याला सेल्फ आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. बोल्ट याच्या 34 व्या वाढदिवसाचे फोटो सोशल मिडीयावर कमालीचे व्हायरल झाले होते. या पार्टीमध्ये आलेले पाहुणे सोशल डिस्टंसिंग सोडा मास्क न लावता नाचत-गात होते. बोल्टने पार्टीनंतर 'बेस्ट बर्थडे एव्हर' असे ट्वीटही केले होते.
जमैकामध्ये आतापर्यंत कोरोनाचे 1412 रुग्ण सापडले आहेत. तर 16 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 14 दिवसांत 410 रुग्ण सापडले होते. यामुळे जमैकामध्ये कोरोना पसरण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. बोल्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर गेलने कॅरेबिअन प्रीमियर लीगमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आयपीएलमध्ये गेल किंग्स इलेव्हन पंजाबचा महत्वाचा खेळाडू आहे.
बोल्टला कन्यारत्नजमैकाचा महान धावपटू उसेन बोल्ट पहिल्यांदा पिता बनला. त्याची पार्टनर केसी बेनेट हिने मुलीला जन्म दिला. जमैकाचे पंतप्रधान अॅन्ड्रयू होलनेस यांनी सोशल मीडियावर कन्यारत्नप्राप्तीसाठी बोल्टचे अभिनंदन केले आहे. स्थानिक प्रसारमाध्यमानुसार मुलीचा जन्म 20 मे रोजी झाला. त्याआधी ३३ वर्षांच्या बोल्टने मार्च महिन्यात बेनेट लवकरच बाळाला जन्म देणार असल्याचा खुलासा केला होता. ८ आॅलिम्पिक सुवर्णपदकांचा मानकरी असलेल्या बोल्टने १०० आणि २०० मीटर शर्यतीत विश्वविक्रम नोंदवला आहे. वायुवेगाने धावणारा खेळाडू अशी ख्याती असलेल्या बोल्टने २०१७ ला निवृत्ती घेतली.
अन्य महत्वाच्या बातम्या...
Sushant Singh Rajput case: सुशांतच्या हत्येमागे दोन 'डॅडी'; जिम पार्टनर मित्राचा खळबळजनक आरोप
Video: अंतराळात खळबळ उडाली! पृथ्वीवर एकाचवेळी पाच UFO दिसले; रशियाने टिपले
IPL 2020 ला मोठा झटका; तगडा स्वदेशी स्पॉन्सर गमावला
किम जोंग उन कोमात, बहीण उत्तर कोरियाची सत्ताधारी; माजी सहकाऱ्याचा गौप्यस्फोट
Gold Rates सोने खरेदी करायचेय? जाणून घ्या योग्य वेळ अन् साधा संधी