मुंबई : आयपीएल -१५ चे ६० साखळी सामने संपले. या वेळेपर्यंत केवळ गुजरात टायटन्सला प्लेऑफ गाठता आले. पाच वेळेचा विजेता मुंबई आणि गतविजेता चेन्नई यांचे पानिपत झाले. आता तीन जागा शिल्लक आहेत. शर्यतीत सर्वांत आघाडीवर लखनौ सुपर जायंट्स असून त्यानंतर राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा क्रम लागतो. गुजरात टायटन्स (१२ सामने, ९ विजय, ३ पराभव, १८ गुण, अधिक ०.३७६ नेट रन रेट)n प्ले ऑफमध्ये पोहोचलेला एकमेव संघ. आणखी दोन लढती शिल्लक. एक विजय मिळविल्यास दुसरे स्थान कायम राखतील.
लखनौ सुपर जायंट्स- (१२ सामने, ८ विजय, ४ पराभव, १६ गुण, अधिक ०.३८५ नेट रन रेट)n लोकेश राहुलच्या नेतृत्वात लखनौ संघाचे प्लेऑफमधील स्थान निश्चित मानले जाते. शिल्लक दोनपैकी एक लढत जिंकावी लागेल.
राजस्थान रॉयल्स (१२ सामने, ७ विजय, ५ पराभव, १४ गुण, अधिक ०.२२८ नेट रन रेट)n संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थानने धमाकेदार कामगिरी केली. त्यांच्या दोन लढती शिल्लक असून दोन्ही जिंकल्यास १८ गुण होतील.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - (१२ सामने, ७ विजय, ५ पराभव, १४ गुण, उणे ०.११५ नेट रन रेट)n डुप्लेसिसच्या नेतृत्वात आरसीबीचा प्रवास चढ-उतारांचा झालाय. संघ प्लेऑफच्या जवळ पोहोचला आहे; पण अजूनही त्यांना अव्वल दोनमध्ये पोहोचण्याची संधी असेल.
दिल्ली कॅपिटल्स- (१२ सामने, ६ विजय, ६ पराभव, १२ गुण, अधिक ०.२१० नेट रन रेट)n दिल्लीचे १२ गुण आहेत. उर्वरित लढती जिंकून १६ गुण मिळवण्याची संधी आहे. एक लढत मुंबईविरुद्ध आहे. मुंबईने चेन्नईचा पराभव करून त्यांना संघाबाहेर केले.
n सनरायझर्स हैदराबाद (११ सामने, ५ विजय, ६ पराभव, १० गुण, उणे ०.०३१ नेट रन रेट)
पंजाब किंग्ज- (११ सामने,५ विजय, ६ पराभव, १० गुण, अधिक ०.२३१ नेट रन रेट)n या दोन्ही संघांचे प्रत्येकी १० गुण आहेत. प्रत्येकी तीन लढती शिल्लक आहेत. हैदराबाद आणि पंजाबला प्लेऑफची संधी आहे; पण जर त्यांनी एक जरी लढत गमावली तर अन्य संघांच्या जय-पराजयावर त्यांचे गणित ठरेल.
कोलकाता नाईट रायडर्स (१२ सामने, ५ विजय, ७ पराभव, १० गुण, उणे ०.०५७ नेट रन रेट)n दोन वेळा विजेतेपद मिळविणाऱ्या केकेआरचे प्लेऑफमध्ये पोहोचण्याचे स्वप्न भंगण्याची शक्यता आहे. केकेआरने सर्व लढती जरी जिंकल्या तरी १४ गुण होतील. अशा वेळी चमत्कारच त्यांना प्लेऑफमध्ये पोहोचवू शकतो.