Irani Cup 2024 : 'फर्स्ट क्लास' कामगिरी; Abhimanyu Easwaran नं चौथ्या डावात ठोकली तिसरी सेंच्युरी

अभिमन्यू ईश्वरन याने शतकी खेळीसह "फर्स्ट क्लास" क्रिकेटमध्ये  कमालीच्या कामगिरीची नोंद केली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 04:41 PM2024-10-03T16:41:11+5:302024-10-03T16:43:18+5:30

whatsapp join usJoin us
Irani Cup 2024 Easwaran smashes yet another ton makes it 3 hundreds in 4 innings See Record | Irani Cup 2024 : 'फर्स्ट क्लास' कामगिरी; Abhimanyu Easwaran नं चौथ्या डावात ठोकली तिसरी सेंच्युरी

Irani Cup 2024 : 'फर्स्ट क्लास' कामगिरी; Abhimanyu Easwaran नं चौथ्या डावात ठोकली तिसरी सेंच्युरी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

गत रणजी करंडक विजेता मुंबई आणि शेष भारत यांच्यात इराणी चषकसाठीची लढत रंगली आहे. लखनऊच्या  भारतरत्न श्री भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात येत आहे. मुंबईच्या संघाने पहिल्यांदा बॅटिंग करताना कर्णधार अजिंक्य रहाणेची ९७ धावांची संयमी खेळी आणि सर्फराज खान यांच्या धमाकेदार द्विशतकाच्या जोरावर ५३७ धावा केल्याचे पाहायला मिळाले. त्यानंत शेष भारत संघाच्या ताफ्यातून मैदानात उतरलेल्या अभिमन्यू ईश्वरन याने शतकी खेळीसह "फर्स्ट क्लास" क्रिकेटमध्ये  कमालीच्या कामगिरीची नोंद केली आहे. 

ईश्वरनची शतकी हॅटट्रिक
 
देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालकडून खेळणाऱ्या अभिमन्यू ईश्वरन याचे हे प्रथम श्रेणीतील सलग तिसरे शतक आहे. ११७ चेंडूत ८ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने त्याने शतकाला गवसणी घातली. याआधी दुलीप करंड स्पर्धेत इंडिया 'ब' संघाची कॅप्टन्सी करताना त्याने सलग दोन शतके झळकावली होती. याशिवाय रणजी ट्रॉफीतील अखेरच्या सामन्यातही त्याच्या भात्यातून द्विशतक पाहायला मिळाले होते. त्यामुळे पाच प्रथम श्रेणी सामन्यातील त्याच्या भात्यातून निघालेले हे चौथे शतक ठरले. 

कसोटीसाठी टीम इंडियात वर्णी लागली, पण संधी कधीच नाही लाभली

२९ वर्षीय अभिमन्यू ईश्वरन याची गेल्या काही वर्षांत अनेकदा भारतीय कसोटी संघात वर्णी लागल्याचे पाहायला मिळाले. पण पदार्पणाआधीच तो टीम इंडियातून आउट झाला. त्याच्यानंतर आलेल्या यशस्वी जैस्वालनं आपली जागा पक्की केली. पण ईश्वरन अद्यापही प्रतिक्षेतच आहे. आतापर्यंत ९८ प्रथम श्रेणी सामन्यात त्याने २६ शतके झळकावली आहेत. तो भारतीय अ संघाचे नेतृत्वही करताना दिसला आहे.  

ईश्वरन अन् सर्फराज दोघांवरही एकसारखीच वेळ 

अभिमन्यू ईश्वरन  सातत्यपूर्ण कामगिरीसह पुन्हा पुन्हा BCCI निवडकर्त्यांना आपल्यातील धमक दाखवून देताना दिसतोय. पण त्याचटी अवस्थाही अगदी सर्फराज खानसारखी झाली. त्याच्या आधी सर्फराजही वेटिंगवर आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये फर्स्ट क्लास कामगिरी करणाऱ्या या दोन भिडूंशिवाय बीसीसीआय सध्या KL राहुलवर आधिक विश्वास दाखवत आहे. त्यामुळे या गड्यांना आणखी किती वेळ प्रतिक्षा करावी लागणार ते सांग

 

Web Title: Irani Cup 2024 Easwaran smashes yet another ton makes it 3 hundreds in 4 innings See Record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.