ठळक मुद्देहनुमा विहारी-अजिंक्य रहाणेने शेष भारताचा डाव सावरलाविहारीची शकती खेळी, रहाणेचे अर्धशतकविदर्भविरुद्ध शेष भारताची मोठ्या आघाडीकडे कूच
नागपूर, इराणी चषक : शेष भारत आणि विदर्भ यांच्यातील इराणी चषक सामना रंगतदार अवस्थेत आला आहे. शेष भारताने अजिंक्य रहाणे व हनुमा विहारीच्या दमदार खेळीच्या जोरावर दुसऱ्या डावात मोठ्या आघाडीच्या दिशेने कूच केली आहे. शेष भारताच्या पहिल्या डावातील 330 धावांच्या प्रत्युत्तरात विदर्भने 425 धावा चोपल्या. दुसऱ्या डावात शेष भारताने संयमी खेळ करताना उपहारापर्यंत 2 बाद 221 धावा करताना 122 धावांची आघाडी घेतली. या डावातही विहारीने शकती खेळी करताना एक भीमकाय पराक्रम केला. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला, तर त्याने आणखी एका विक्रमात भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनशी बरोबरी केली. या खेळीसह विहारीने भारतीय कसोटी संघातील स्थानासाठी दावेदारी मजबूत केली आहे.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विहारीला भारतीय संघात स्थान देण्यात आले होते. त्याने पहिल्याच सामन्यात अर्धशतकी खेळी करून आपली चुणूक दाखवली. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही त्याला संधी मिळाली, परंतु त्याला मोठी खेळी साकारता आली नाही. पण, इराणी चषक सामन्यात त्याची बॅट चांगलीच तळपली आहे. त्याने दुसऱ्या डावात 219 चेंडूंचा सामना करताना शतक ठोकले. पहिल्या डावातही त्याने 114 ( 211 चेंडू, 11 चौकार व 2 षटकार ) धावांची खेळी साकारली होती. इराणी चषक सामन्यात दोन्ही डावांत शतक करणारा तो दुसरा फलंदाज ठरला आहे. याआधी शिखर धवनने 2011 मध्ये राजस्थानविरुद्ध दोन्ही डावांत शतक ठोकले होते.
इराणी चषक सामन्यात सलग तीन डावांत शकत करण्याचा विक्रमही विहारीने नावावर केला. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. त्याने गतवर्षी विदर्भविरुद्ध 183 धावांची खेळी केली होती. त्यानंतर 2019 मध्ये त्याने दोन्ही डावांत अनुक्रमे 114 व 101 ( खेळत आहे) धावा केल्या. विहारीच्या या खेळीने भारतीय कसोटी संघासाठी एक सक्षम पर्याय निवड समितीला मिळाला आहे.
Web Title: Irani Trophy : HANUMA VIHARI is the first player in the history of the tournament to score centuries in three consecutive innings
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.