नागपूर : भारताच्या कसोटी संघातील तीन दिग्गजांपैकी ज्याच्यावर सर्वाधिक लक्ष होते तो शेष भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणे विदर्भाविरुद्ध इराणी करंडकाच्या पहिल्या डावात चक्क ‘फ्लॉप’ झाला. त्याचवेळी त्याचे अपयश भरून काढणारे मयांक अगरवाल (९५) आणि हनुमा विहारीच्या (११४) दमदार खेळीच्या जोरावर शेष भारताने पहिल्या डावात मंगळवारी सर्वबाद ३३० पर्यंत मजल गाठली. विहारीने शानदार शतक झळकवलेम् तर मयांकचे शतक पाच धावांनी हुकले.व्हीसीएच्या जामठा स्टेडियमवर चांगल्या फलंदाजीच्या जोरावर विश्वचषकासाठी संघात दावेदारी सादर करण्याची रहाणेला संधी होती, पण तो केवळ १३ धावांवर बाद झाला. विश्वचषकाच्या संभाव्य संघात रहाणेकडे राखीव सलामीवीर म्हणून पाहिले जात आहे. रहाणेने नाणेफेक जिंकताच फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या सत्रात मयांकने वर्चस्व गाजवून उमेश यादवच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या विदर्भाच्या माºयाचा चांगलाच समाचार घेतला. अनमोलप्रीत सिंग (१५) लवकर बाद झाल्यानंतर मयांकने स्वत: १३४ चेंडूत १० चौकार आणि ३ षटकारासह ९५ धावांचे योगदान देत विहारीसह दुसºया गड्यासाठी १२५ धावांची भागीदारी केली. मयांक बाद होताच विहारीने सूत्रे स्वत:कडे घेतली.दुसरे सत्र विदर्भाच्या गोलंदाजांनी गाजविले. अगरवाल यश ठाकूरचा, तर रहाणे सरवटेचा बळी ठरला. श्रेयस अय्यरला (१९) कर्णेवारने पायचित केले. यष्टिरक्षक-फलंदाज ईशांत किशन (२) हा देखील चहापानाच्या आधी बाद झाला. विहारीने एक टोक सांभाळले, पण दुसºया टोकाहून पडझड सुरूच राहिली. कृष्णप्पा गौतम (७) आणि धर्मेंद्र जडेजा (६) हे विहारीला साथ देऊ शकले नाही. राहुल चहरने (२२) मात्र काही वेळ सोबत केली. विहारी- चहर यांनी आठव्या गड्यासाठी ४७ धावांची भागीदारी केली. दरम्यान विहारीने सरवटेला लाँगआॅनवर चौकार ठोकून १६ वे प्रथमश्रेणी शतक साजरे केले. २११ चेंडूत ११ चौकार आणि दोन षटकारांसह शतक साजरे करणाºया विहारीने लगेच सरवटेच्या चेंडूवर स्लिपमध्ये फैजकडे झेल दिला. दहाव्या स्थानावर आलेल्या अंकित राजपूतने २५ धावा केल्या.विदर्भाला मंगळवारी जखमी उमेशची उणीव जाणवली. त्याच्या अनुपस्थितीत अक्षय वखरे आणि आदित्य सरवटे यांनी प्रत्येकी तीन तर वेगवान रजनीश गुरबानी याने दोन गडी बाद केले.वसीम जाफर फिटनेसमध्ये अपयशीसामन्याआधी अनुभवी फलंदाज वसीम जाफर फिटनेसमध्ये अपयशी ठरताच, त्याची विक्रमी १३ व्यांदा इराणी करंडक खेळण्याची संधी हुकली. जाफरने यंदाच्या रणजी सत्रात ११ सामन्यात १०३७ धावा केल्यामुळे विदर्भाला फलंदाजीच्या वेळी जाफरची उणीव जाणवण्याची शक्यता आहे.धावफलकशेष भारत (पहिला डाव) : मयंक अगरवाल झे. गुरबानी गो. यश ठाकूर ९५, अनमोलप्रीत सिंग त्रि.गो. गुरबानी १५, हनुमा विहारी झे. फझल गो. सरवटे ११४, अजिंक्य रहाणे झे. संजय गो.सरवटे १३, श्रेयस अय्यर पायचित गो.अक्षय कर्णेवार १९, ईशान किशन झे. गुरबानी गो. वखरे २, कृष्णप्पा गौतम झे. गुरबानी गो. वखरे ७,धर्मेंद्र जडेजा त्रि.गो. सरवटे ६, राहुल चहर त्रि.गो. गुरबानी २२, अंकित राजपूत त्रि.गो. वखरे २५, तन्वीर उल हक नाबाद ०. अवांतर : १२. एकूण : ८९.४ षटकात सर्वबाद ३३० धावा.गडी बाद क्रम : १/४६, २/१७१, ३/१८६, ४/२३१, ५/२३४, ६/२४६, ७/२५८, ८/३०५, ९/३०५, १०/३३०.गोलंदाजी : रजनीश गुरबानी १५-२-५८-२, यश ठाकूर १७-३-५२-१, आदित्य सरवटे २८-५-९९-३, अक्षय कर्णेवार १५-३-५०-१, अक्षय वखरे १४.४-०-६२-३.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- इराणी करंडक: मयांक, विहारी यांनी सावरला शेष भारताचा डाव
इराणी करंडक: मयांक, विहारी यांनी सावरला शेष भारताचा डाव
भारताच्या कसोटी संघातील तीन दिग्गजांपैकी ज्याच्यावर सर्वाधिक लक्ष होते तो शेष भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणे विदर्भाविरुद्ध इराणी करंडकाच्या पहिल्या डावात चक्क ‘फ्लॉप’ झाला.
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 4:49 AM