Ireland vs India, 2nd T20I : दीपक हुडा ( Deepak Hooda) व संजू सॅमसन ( Sanju Samson) यांनी १७६ धावांची विक्रमी भागीदारी केली. भारताकडून ही ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम भागीदारी ठरली. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा दीपक हा भारताचा चौथा फलंदाज ठरला. दीपकने ५७ चेंडूंत ९ चौकार व ६ षटकारांच्या मदतीने १०४ धावा केल्या. रोहित शर्मा (४), लोकेश राहुल ( २), सुरेश रैना ( १) यांनी ट्वेंटी-२०त शतक झळकावले आहेत. संजूने मिळालेल्या संधीचं सोनं करताना ४२ चेंडूंत ९ चौकार व ४ षटकारांसह ७७ धावा केल्या.
त्याने दीपकह ८७ चेंडूंत १७६ धावांची भागीदारी केली आणि ही ट्वेंटी-२०तील भारताकडून सर्वोत्तम भागीदारी ठरली. यापूर्वी लोकेश राहुल व शिखर धवन यांच्या १६५ धावांचा ( vs Sri Lanka at Indore in 2017) विक्रम होता. दीपकची १०४ धावांची खेळी ही आयर्लंडविरुद्ध भारतीय फलंदाजाची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. यापूर्वी रोहितने ९७ धावा केल्या होत्या. संजू या विक्रमात ७७ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. सूर्यकुमार यादव ( १५) दिनेश कार्तिक ( ०), अक्षर पटेल ( ०) व हर्षल पटेल ( ०) हे झटपट बाद झाले. भारताने ७ बाद २२७ धावा केल्या.
ट्वेंटी-२० क्रिकेटमधील भारताची ही चौथी सर्वोत्तम खेळी ठरली.
- २६०-५ वि. श्रीलंका, इंदौर ( २०१७)
- २४४-४ वि. वेस्ट इंडिज, फ्लोरिडा ( २०१६)
- २४०-३ वि. वेस्ट इंडिज, मुंबई ( २०१९)
- २२७-७ वि. आयर्लंड, डबलिन ( २०२२)
२२४ -२ वि. इंग्लंड, अहमदाबाद ( २०२१)
ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये दुसऱ्या विकेटसाठी दीपक-संजूने १७६ धावा करून सर्वोत्तम भागीदारीची नोंद केली. त्यांनी इंग्लंडच्या जोस बटलर व डेवीड मलान यांचा १६७* ( वि. दक्षिण आफ्रिका, २०२०) धावांचा विक्रम मोडला.
आयर्लंडमध्ये संजू सॅमसनची लोकप्रियता का?
हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.. जेव्हा त्याला संघातील बदलाबाबत विचारण्यात आले तेव्हा त्याने ऋतुराज गायकवाडच्या जागी संजू सॅमसन खेळणार असल्याचे जाहीर केले. यासह त्याने आणखी दोन बदल सांगितले. पण, जेव्हा संजूचे नाव घेतले गेले तेव्हा प्रेक्षकांनी जल्लोष साजरा केला. यापूर्वीही पहिल्या सामन्या दरम्यान संजू सीमारेषेजवळ असताना त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी प्रेक्षकांची झुंबड उडाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
आयर्लंडमध्ये २०१६ साली झालेल्या जनगणनेनुसार २१ हजार भारतीय मुळ वंशाची लोकं येथे राहतात.. त्यापैकी निम्म्याहून अधिक जणं ही केरळची स्थानिक भाषा बोलणारी आहेत. त्यामुळे संजू येथे अधिक लोकप्रिय आहे.
Web Title: IRE vs IND, 2nd T20I Live Updates : Crowds are cheering when Hardik Pandya declared Sanju Samson is playing tonight, know why, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.