IRE vs IND, 2nd T20I : भारताने दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात आयर्लंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. दीपक हुडा ( Deepak Hooda) व संजू सॅमसन ( Sanju Samson) यांनी १७६ धावांची भागीदारी केली. भारताकडून ही ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम भागीदारी ठरली. दीपक हुडाने ट्वेंटी-२०तील पहिले शतक झळकावले. दीपकने ५७ चेंडूंत ९ चौकार व ६ षटकारांच्या मदतीने १०४ धावा केल्या. रोहित शर्मा, लोकेश राहुल, सुरेश रैना यांच्यानंतर दीपकने ट्वेंटी-२०त शतक झळकावले. भारताच्या एकूण धावसंख्येत दीपक व संजू यांनी मिळून १८ चौकार व १० षटकार अशा १३२ धावा अवघ्या २८ चेंडूंत कुटल्या.
संजूच्या बॅटीतून पहिल्याच चेंडूवर चौकार आला. पण, आज इशान किशन ( ३) अपयशी ठरला, तिसऱ्या षटकात मार्क अडेरने त्याला बाद केले. त्यानंतर आलेल्या दीपक हुडाने अडेरच्या गोलंदाजीवर खणखणीत षटकार खेचला. मागच्या सामन्यातील मॅच विनर दीपक आज आक्रमक फॉर्मात दिसला.. त्याने २७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि संजूनेही पहिले अर्धशतक झळकावताना दीपकसह शतकी भागीदारीही पूर्ण केली. या दोघांना
आयर्लंडच्या खेळाडूंकडून जीवदानही मिळाले. दीपकची फटकेबाजी सुरू असताना संजूने बचावात्मक पवित्राच घेतला होता. पण, १४व्या षटकानंतर संजूनेही गिअर बदलला. गॅरेथ डेनलीच्या ४ षटकांत या दोघांनी ४३ धावा चोपल्या. संजू ४२ चेंडूंत ९ चौकार व ४ षटकारांसह ७७ धावांवर बाद झाला.
त्याने दीपकह ८७ चेंडूंत १७६ धावांची भागीदारी केली आणि ही ट्वेंटी-२०तील भारताकडून सर्वोत्तम भागीदारी ठरली. यापूर्वी लोकेश राहुल व शिखर धवन यांच्या १६५ धावांचा ( vs Sri Lanka at Indore in 2017) विक्रम होता. दीपकने ५७ चेंडूंत ९ चौकार व ६ षटकारांच्या मदतीने १०४ धावा केल्या. आयर्लंडविरुद्ध भारतीय फलंदाजाची ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. यापूर्वी रोहितने ९७ धावा केल्या होत्या. संजू या विक्रमात ७७ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. सूर्यकुमार यादव ( १५) दिनेश कार्तिक ( ०), अक्षर पटेल ( ०) व हर्षल पटेल ( ०) हे झटपट बाद झाले. भारताने ७ बाद २२७ धावा केल्या.
Web Title: IRE vs IND, 2nd T20I Live Updates : Deepak Hooda - 104 (57) with 9 fours and 6 sixes, Sanju Samson 77(42); India 227/7
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.