IRE vs IND, 2nd T20I : भारताने दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात आयर्लंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. दीपक हुडा ( Deepak Hooda) व संजू सॅमसन ( Sanju Samson) यांनी १७६ धावांची भागीदारी केली. भारताकडून ही ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम भागीदारी ठरली. दीपक हुडाने ट्वेंटी-२०तील पहिले शतक झळकावले. दीपकने ५७ चेंडूंत ९ चौकार व ६ षटकारांच्या मदतीने १०४ धावा केल्या. रोहित शर्मा, लोकेश राहुल, सुरेश रैना यांच्यानंतर दीपकने ट्वेंटी-२०त शतक झळकावले. भारताच्या एकूण धावसंख्येत दीपक व संजू यांनी मिळून १८ चौकार व १० षटकार अशा १३२ धावा अवघ्या २८ चेंडूंत कुटल्या.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- Deepak Hooda, IRE vs IND, 2nd T20I : २८ चेंडूंत १३२ धावा, दीपक हुडा-संजू सॅमसनचा नाद खुळा; भारताने उभारला डोंगर
Deepak Hooda, IRE vs IND, 2nd T20I : २८ चेंडूंत १३२ धावा, दीपक हुडा-संजू सॅमसनचा नाद खुळा; भारताने उभारला डोंगर
IRE vs IND, 2nd T20I : भारताने दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात आयर्लंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. दीपक हुडा ( Deepak Hooda) व संजू सॅमसन ( Sanju Samson) यांनी १७६ धावांची भागीदारी केली.
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 10:41 PM