IRE vs IND, 2nd T20I : टीम इंडियाने बाजी मारली, परंतु आयर्लंडने अखेरच्या चेंडूपर्यंत झुंज दिली; यजमानांनी खेचले सर्वाधिक षटकार

Ireland vs India, 2nd T20I : तगड्या लक्ष्यासमोर आयर्लंडचे खेळाडू चाचपडले नाही. पॉल स्टर्लिंग, कर्णधार अँडी बलबर्नी, हॅरी टेक्टर व जॉर्ट डॉकरेल यांनी तोडीसतोड खेळ केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 12:39 AM2022-06-29T00:39:20+5:302022-06-29T00:54:28+5:30

whatsapp join usJoin us
IRE vs IND, 2nd T20I Live Updates : India (225/7 in 20 overs) beat Ireland (221/5) by four runs, win series 2-0 | IRE vs IND, 2nd T20I : टीम इंडियाने बाजी मारली, परंतु आयर्लंडने अखेरच्या चेंडूपर्यंत झुंज दिली; यजमानांनी खेचले सर्वाधिक षटकार

IRE vs IND, 2nd T20I : टीम इंडियाने बाजी मारली, परंतु आयर्लंडने अखेरच्या चेंडूपर्यंत झुंज दिली; यजमानांनी खेचले सर्वाधिक षटकार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Ireland vs India, 2nd T20I : दीपक हुडा ( Deepak Hooda) व संजू सॅमसन ( Sanju Samson) यांच्या १७६ धावांच्या विक्रमी भागीदारीच्या जोरावर भारताने ७ बाद २२५ धावांचा डोंगर उभा केला. पण, या तगड्या लक्ष्यासमोर आयर्लंडचे खेळाडू चाचपडले नाही. पॉल स्टर्लिंग, कर्णधार अँडी बलबर्नी, हॅरी टेक्टर व जॉर्ट डॉकरेल यांनी तोडीसतोड खेळ केला. आयर्लंडनेभारतीय गोलंदाजांना टफ फाईट देताना सामना अखेरच्या षटकापर्यंत चुरशीचा बनवला. भुवनेश्वर कुमारने मोक्याच्या क्षणी विकेट घेत सामन्याचे चित्र बदलले अन् टीम इंडियाने २-० अशी मालिका जिंकली. आयर्लंडने कडवी टक्कर देताना दोनशेपार मजर मारली. 


दीपकने ५७ चेंडूंत ९ चौकार व ६ षटकारांच्या मदतीने १०४ धावा केल्या. संजूने मिळालेल्या संधीचं सोनं करताना ४२ चेंडूंत ९ चौकार व ४ षटकारांसह ७७ धावा केल्या. त्याने दीपकह ८७ चेंडूंत १७६ धावांची भागीदारी केली आणि ही ट्वेंटी-२०तील भारताकडून सर्वोत्तम भागीदारी ठरली.  सूर्यकुमार यादव ( १५) दिनेश कार्तिक ( ०),  अक्षर पटेल ( ०) व हर्षल पटेल ( ०) हे झटपट बाद झाले. भारताने ७ बाद २२७ धावा केल्या. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये दुसऱ्या विकेटसाठी दीपक-संजूने १७६ धावा करून सर्वोत्तम भागीदारीची नोंद केली. त्यांनी इंग्लंडच्या जोस बटलर व डेवीड मलान यांचा १६७* ( वि. दक्षिण आफ्रिका, २०२०) धावांचा विक्रम मोडला. 

आयर्लंडसमोर सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले... 
२०व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर हार्दिक पांड्याने फटका मारला, पण त्यावेळी त्याने दोन धावा काढल्याचे सांगण्यात आले. पण, प्रत्यक्षात त्या चेंडूवर एकही धावा आलेली नव्हती. त्यामुळे भारताच्या २२७ धावांतून दोन धावा वजा करून आयर्लंडसमोर २२६ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले. 


प्रत्युत्तरात आयर्लंडकडून आक्रमक सुरुवात झाली. अनुभवी पॉल स्टर्लिंग व कर्णधार अँडी बलबर्नी यांनी पहिल्या पॉवर प्लेमध्ये ७३ धावा चोपल्या. स्टर्लिंगने १८ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ४० धावा कुटल्या. रवी बिश्नोनीने त्याला सहाव्या षटकात बाद केले. त्यानंतर अँडीची फटकेबाजी सुरू झाली आणि आयर्लंडने ९ षटकांत १०० धावा फलकावर चढवल्या आहेत. हर्षल पटेलने भारताला मोठी विकेट मिळवून दिली. अँडी ३७ चेंडूंत ३ चौकार  व ७ षटकारांच्या मदतीने ६० धावा करून माघारी परतला. गॅरेथ डेलनीन ( ०) रन आऊट झाला. 


पहिल्या सामन्यात हिट ठरलेली हॅरी टेक्टर व लोर्कन टकर ही खेळपट्टीवर होती. उम्रान मलिकने ही जोडी तोडताना पहिली आंतरराष्ट्रीय विकेट मिळवली. टकर ( ६) झेलबाद झाला. त्यानंतर आलेल्या जॉर्ज डॉकरेलने १५व्या षटकात रवी बिश्नोईच्या गोलंदाजीवर १७ धावा कुटल्या. आयर्लंडला ३० चेंडूंत ६२ धावा करायच्या होत्या. टेक्टर व डॉकरेल यांनी हर्षल पटेलने टाकलेल्या १७व्या षटकात १४ धावा केल्या. भुवनेश्वर कुमारने ही २१ चेंडूंवरील ४७ धावांची भागीदारी संपुष्टात आणताना टेक्टरला ३९ ( २८ चेंडू, ५ चौकार) धावांवर माघारी पाठवले. भुवीने त्या षटकात ७ धावा दिल्या. आयर्लंडला १२ चेंडूंत ३१ धावा हव्या होत्या. आयर्लंडने या सामन्यात १३ वा षटकार खेचून सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला. यापूर्वी २०१७ मध्ये त्यांनी अफगाणिस्तानविरुद्ध १२ षटकार खेचले होते. 


६ चेंडूंत १७ असा सामना चुरशीचा झाला. हार्दिकने अखेरचे षटक उम्रानला टाकण्यास दिले. पहिली दोन चेंडू निर्धाव फेकली, परंतु दुसरा चेंडू नो बॉल ठरला अन् फ्री हिटवर चौकार खेचला गेला. ४ चेंडूंत १२ धावांची आयर्लंडला गरज होती. मार्क एडरने स्लिपच्या डोक्यावरून चौकार मिळवला... चौथ्या चेंडूवर १ धावा आली अन् २ चेंडूंत ७ धावा आवश्यक होत्या. पाचवा चेंडूवर एक धाव आली.. आयर्लंडने ५ बाद २२१ धावांपर्यंत मजल मारली. भारताने ४ धावांनी सामना जिंकला. मार्क एडरने १२ चेंडूंत नाबाद २३, तर डॉकरेलने १६ चेंडूंत नाबाद ३४ धावा केल्या. 

Web Title: IRE vs IND, 2nd T20I Live Updates : India (225/7 in 20 overs) beat Ireland (221/5) by four runs, win series 2-0

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.