Join us

PAK vs IRE: पहिल्या पराभवानंतर पाकिस्तानने लाज राखली; आयर्लंडची कडवी झुंज!

शुक्रवारी आयर्लंडने पाकिस्तानच्या वर्ल्ड कप संघाचा पराभव केल्याने शेजाऱ्यांची क्रिकेट वर्तुळात फजिती झाली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 13:23 IST

Open in App

IRE vs PAK 2nd T20 Match : शुक्रवारी नवख्या आयर्लंडनेपाकिस्तानच्या वर्ल्ड कप संघाचा पराभव केल्याने शेजाऱ्यांची क्रिकेट वर्तुळात फजिती झाली. आयर्लंड दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तानला मालिकेतील पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. पण, रविवारी झालेला दुसरा सामना जिंकून शेजाऱ्यांनी १-१ अशी मालिकेत बरोबरी साधली. त्यामुळे तिसरा सामना निर्णायक असणार आहे. दुसऱ्या सामन्यात पाहुण्या पाकिस्तानने नाणेफेक जिंकून यजमानांना प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. आपल्या घरच्या मैदानावर तगडी धावसंख्या उभारण्यात आयर्लंडला यश आले. त्यांनी निर्धारित २० षटकांत ७ बाद १९३ धावा केल्या. 

आयर्लंडने दिलेल्या तगड्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवान आणि फखर झमान यांनी स्फोटक खेळी केली. सैय अयुब (६) आणि कर्णधार बाबर आझम (०) स्वस्तात परतल्यानंतर रिझवान-झमानच्या जोडीने मोर्चा सांभाळला. त्यांनी दोघांनी अर्धशतके झळकावून सहज लक्ष्य गाठले.

पाकिस्तानने १६.५ षटकांत ३ बाद १९५ धावा करून मोठा विजय साकारला. बाबरच्या नेतृत्वातील संघाने दुसरा सामना ७ गडी आणि १९ चेंडू राखून आपल्या नावावर केला. फखर झमानने ४० चेंडूत ६ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने सर्वाधिक ७८ धावा केल्या, तर रिझवान ४६ चेंडूत ७५ धावा करून नाबाद परतला.

दुसऱ्या सामन्यात सांघिक खेळी करण्यात पाकिस्तानला यश आले. शाहीन शाह आफ्रिदीने सर्वाधिक (३) बळी घेऊन यजमानांना २०० च्या आत रोखले. याशिवाय अब्बास आफ्रिदी (२) आणि मोहम्मद आमिर आणि नसीम शाह यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला. 

टॅग्स :पाकिस्तानआयर्लंडटी-20 क्रिकेट