आयर्लंडकडून श्रीलंकेची धुलाई! एकाच डावात केल्या ४९२ धावा; दोघांची शतकं, जयसूर्याने लाज वाचवली

ire vs sl test : सध्या आयर्लंड आणि श्रीलंका यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 03:15 PM2023-04-25T15:15:16+5:302023-04-25T15:15:40+5:30

whatsapp join usJoin us
ire vs sl live Ireland scored 492 in 145.3 overs in the first innings of the second Test against Sri Lanka, Paul Stirling and Curtis Campher scored centuries while Prabath Jayasuriya took 5 wickets | आयर्लंडकडून श्रीलंकेची धुलाई! एकाच डावात केल्या ४९२ धावा; दोघांची शतकं, जयसूर्याने लाज वाचवली

आयर्लंडकडून श्रीलंकेची धुलाई! एकाच डावात केल्या ४९२ धावा; दोघांची शतकं, जयसूर्याने लाज वाचवली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ire vs sl live score । नवी दिल्ली : सध्या आयर्लंड आणि श्रीलंका (SL vs IRE Test Series) यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. दुसऱ्या सामन्यातील आज दुसरा दिवस असून पाहुण्या आयर्लंडच्या संघाने यजमान श्रीलंकेचा चांगलाच समाचार घेतला. आयर्लंडने आपल्या पहिल्या डावात धावांचा डोंगर उभारला असून श्रीलंकेची डोकेदुखी वाढवली आहे. खरं तर आयर्लंडने पहिल्या डावात १४५.३ षटकांत सर्वबाद तब्बल ४९२ धावा केल्या. सांघिक खेळीच्या जोरावर पाहुण्या संघाने श्रीलंकेच्या गोलंदाजांना घाम फोडला. 

आयर्लंडकडून कर्णधार अँड्र्यू बालबर्नी (९५), पॉल स्टर्लिंग (१०३), लॉर्कन टर्कर (८०) आणि कर्टिस कॅम्फरने (१११) धावा केल्या. स्टर्लिंग आणि कॅम्फर यांच्या शतकी खेळीच्या जोरावर आयर्लंडने श्रीलंकेसमोर धावांचा डोंगर उभारला. 

श्रीलंकेकडून प्रभात जयसूर्याने सर्वाधिक ५ बळी घेतले, तर विश्वा फर्नांडो आणि असिथा फर्नांडो यांना प्रत्येकी २-२ बळी घेण्यात यश आले. याशिवाय रमेश मेंडिसने प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार बालबर्नीला बाद केले. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी सुरूवातीला प्रभावी मारा करत आयर्लंडच्या फलंदाजांना शांत ठेवले. दोन्ही सलामीवीरांना स्वस्तात माघारी पाठवण्यात जयसूर्या आणि फर्नांडो यांना यश आले. पण नंतर आयर्लंडचा कर्णधार बालबर्नीने डाव सावरला आणि ९५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 


 

Web Title: ire vs sl live Ireland scored 492 in 145.3 overs in the first innings of the second Test against Sri Lanka, Paul Stirling and Curtis Campher scored centuries while Prabath Jayasuriya took 5 wickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.