Ireland name T20I squad for India series - जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पुढील आठवड्यात आयर्लंड दौऱ्यावर तीन ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी रवाना होणार आहे. भारताचा प्रमुख गोलंदाज बुमराह बऱ्याच कालावधीनंतर संघात पुनरागमन करत आहे आणि आगामी वर्ल्ड कप स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून त्याच्यासाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची आहे. पण, आयर्लंड सहजासहजी त्याला मालिकेत यश मिळवू देणार नाहीत. ट्वेंटी-२० क्रमवारीतील नंबर १ संघाचा सामना करण्यासाठी आयर्लंडने १५ सदस्यीय तगडा संघ आज जाहीर केला.
नुकत्याच पार पडलेल्या पात्रता स्पर्धेत विजय मिळवून आयर्लंडने २०२४ मध्ये होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे तिकिट पक्कं केलं आहे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास नक्कीच उंचावलेला असेल. वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत खेळणारे बरेचसे खेळाडू भारताला टक्कर देण्यासाठी तयार आहेत. अष्टपैलू फिओन हँड आणि गॅरेथ डेलनी यांचे पुनरागमन होत आहे.
आयर्लंडचा संघ - पॉल स्टीर्लिंग ( कर्णधार), एंड्य्रू बालबर्नी, मार्क एडर, रॉस एडर, कर्टीस कॅम्फर, गॅरेथ डेलनी, जॉर्ज डॉक्रेल, फिओन हँड, जॉश लिटल, बॅरी मॅकर्थी, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर, थीओ व्हॅन वोएकॉम, बेन व्हाईट, क्रेग यंग ( Ireland T20I squad: Paul Stirling (c), Andrew Balbirnie, Mark Adair, Ross Adair, Curtis Campher, Gareth Delany, George Dockrell, Fionn Hand, Josh Little, Barry McCarthy, Harry Tector, Lorcan Tucker, Theo van Woerkom, Ben White, Craig Young.)
भारताचा संघ - जसप्रीत बुमराह ( कर्णधार), ऋतुराज गायकवाड ( उप कर्णधार), यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन, जितेश शर्मा, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आवेश खान.
मालिकेचे वेळापत्रक ( India tour of Ireland fixtures)१८ ऑगस्ट - पहिली ट्वेंटी-२० २० ऑगस्ट - दुसरी ट्वेंटी-२०२३ ऑगस्ट - तिसरी ट्वेंटी-२०