डब्लिन - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात अनेक धक्कादायक विजयांची नोंद केलेला आयर्लंड संघ शुक्रवारी पाकिस्तानविरुद्ध आपला पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळण्यास मैदानात उतरेल. या सामन्यातही सनसनाटी विजय नोंदवून दिमाखात पदार्पण करण्याचा निर्धार आयर्लंड केला आहे.
विशेष म्हणजे २००७ साली वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत आयर्लंडने पाकिस्तानला पराभूत करुन त्यांना स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला होता. त्यावेळी आयर्लंडच्या संघात समावेश असलले अनेक खेळाडू कसोटी सामन्यातही खेळणार असल्याने पुन्हा एकदा त्यांच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
त्या ऐतिहासिक सामन्यात वेगवान गोलंदाज बायड रैनकिन याने भेदक मारा करत ३ बळी मिळवले होते आणि पाकिस्तानचा डाव १३२ धावांत सपुष्टात आला होता. शुक्रवारी रैनकिन कसोटी पदार्पणातही त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याच्या प्रयत्नात खेळेल. त्याचप्रमाणे विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या विजयाचा हीरो ठरलेला नील ओ ब्रायनच्या कामगिरीवरही विशेष लक्ष असेल. त्या सामन्यात ब्रायनने ७२ धावांची निर्णायक खेळी केली होती. (वृत्तसंस्था)
Web Title: Ireland will make Test Cricket debut today
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.