Join us

टीम इंडियाचा नव्या वर्षातील पहिला वनडे सामना; पहिल्यांदा फिल्डिंगसाठी मैदानात उतरला संघ

टीम इंडिया नव्या वर्षातील पहिला वनडे सामना जिंकून वर्षाची सुरुवात एकदम धमाक्यात करण्यासाठी उत्सुक असेल. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 11:01 IST

Open in App

India Women vs Ireland Women, 1st ODI :  स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघ नव्या वर्षातील पहिली वनडे मालिका खेळण्यासाठी राजकोटच्या मैदानात उतरलाय. आयर्लंड महिला संघानं तीन सामन्यांच्या पहिल्या वनडे सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आयर्लंडच्या संघानं सेट केलेले टार्गेट चेस करून टीम इंडिया नव्या वर्षातील पहिला वनडे सामना जिंकून वर्षाची सुरुवात एकदम धमाक्यात करण्यासाठी उत्सुक असेल. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

भारतीय संघाचा दबदबा

भारत आणि आयर्लंड महिला संघामध्ये आतापर्यंत १२ वनडे सामने खेळवण्यात आले आहेत. या सर्व सामन्यात भारतीय संघानं विजय मिळवला आहे. त्यामुळे आयर्लंड संघासाठी ही लढाई सोपी नसेल. दुसरीकडे भारतीय संघ आपला विजयी धमाका कायम ठेवत आपला विक्रम आणखी सुधारण्यासाठी प्रयत्नशील असेल.  

भारत महिला संघाची प्लेइंग इलेव्हन

स्मृती मानधना (कर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्ज, तेजल हसबनीस, रिचा घोष (विकेट किपर बॅटर), दीप्ती शर्मा, सायली सतघरे, सायमा ठाकोर, प्रिया मिश्रा, तितास साधू.

आयर्लंड महिला प्लेइंग इलेव्हन 

सारा फोर्ब्स, गॅबी लुईस (कर्णधार), उना रेमंड-होई, ओर्ला प्रेंडरगास्ट, लॉरा डेलानी, लीह पॉल, कुल्टर रेली (विकेट किपर बॅटर), अर्लीन केली, जॉर्जिना डेम्पसी, फ्रेया सार्जेंट, एमी मॅग्वायर

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघस्मृती मानधनाजेमिमा रॉड्रिग्ज