पाच वर्षांपूर्वी इंग्लंडकडून कसोटी पदार्पण अन् आज आयर्लंडकडून खेळणार; कोण आहे हा खेळाडू ?

इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यात आजपासून एकमेव कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर होणाऱ्या या लढतीत इंग्लंडचाच खेळाडू यजमानांच्या विरोधात मैदानावर उतरणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 03:09 PM2019-07-24T15:09:09+5:302019-07-24T15:11:51+5:30

whatsapp join usJoin us
Ireland’s Boyd Rankin to face England – the country he made Test debut for | पाच वर्षांपूर्वी इंग्लंडकडून कसोटी पदार्पण अन् आज आयर्लंडकडून खेळणार; कोण आहे हा खेळाडू ?

पाच वर्षांपूर्वी इंग्लंडकडून कसोटी पदार्पण अन् आज आयर्लंडकडून खेळणार; कोण आहे हा खेळाडू ?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लॉर्ड्सः इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यात आजपासून एकमेव कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर होणाऱ्या या लढतीत इंग्लंडचाच खेळाडू यजमानांच्या विरोधात मैदानावर उतरणार आहे. पाच वर्षांपूर्वी इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये त्यानं पदार्पण केले होते आणि आज होणाऱ्या सामन्यात तो आयर्लंडचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जाणून घ्या कोण आहे तो...

बॉयड रँकिन असे या खेळाडूचे नाव आहे. त्याने इंग्लंड आणि आयर्लंड या दोन्ही देशांकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळले आहेत. 6 फुट 7 इंच इतकी उंची असलेला रँकिन डावखुरा जलदगती गोलंदाज आहे. 5 जुलै 1984 मध्ये लंडन येथे त्याचा जन्म झाला होता. त्याने 2014 मध्ये इंग्लंडकडून ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत पदार्पण केले होते. त्या एकमेव कसोटीत त्यानं 13 धावा देत एक विकेट घेतली होती. 

35 वर्षीय रँकिनने आतापर्यंत दोन कसोटीत चार विकेट, 73 वन डे सामन्यांत 104 आणि 36 ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 39 विकेट घेतल्या आहेत. रँकिन म्हणाला की,''हा माझ्यासमोर अजब परिस्थिती निर्माण झाली आहे. इंग्लंड संघातील खेळाडूंना मी ओळखतो. कारकिर्दीत असा दिवस पाहायला मिळेल, असे कधी वाटलेही नव्हते.'' 

लॉर्ड्सवर इतिहास रचण्यासाठी आयर्लंड सज्ज
क्रिकेट विश्वचषक जिंकल्यानंतर इंग्लंडचा संघ प्रथमच मैदानात उतरणार असून, इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यातील एकमेव चारदिवसीय कसोटी सामन्याला आजपासून लॉर्ड्सवर सुरुवात होणार आहे. अॅशेस मालिकापूर्वी एकमात्र कसोटी सामना इंग्लंड आयर्लंडविरुद्ध खेळणार आहे. विशेष म्हणजे कसोटी पदार्पण केल्यानंतरचा आयर्लंडचा संघ पहिल्यांदाच लॉर्ड्सवर खेळणार आहे.

गेल्या वर्षी आयर्लंडने कसोटी क्रिकेटमध्ये पाकिस्तानविरुद्ध पदार्पण केले होते. परंतु या सामन्यात आयर्लंडला पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र आता विश्वचषक उंचावणाऱ्या इंग्लंडला लॉर्ड्सवरच पराभूत करून ऐतिहासिक विजय मिळवण्यासाठी आयर्लंडचे खेळाडू उत्सुक आहेत.


इंग्लंड संघ जो रूटच्या नेतृत्वाखाली हा सामना खेळणार आहे. इंग्लंडने बेन स्टोक्स आणि जोस बटलर यांना विश्रांती दिली असून, मोईन अली, जॉनी बेअरस्टो, जेसन रॉय हे  फलंदाजीची धुरा सांभाळतील. तसेच इंग्लडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन पोटरीच्या दुखापतीमुळे आयर्लंडविरुद्धच्या सामन्याला मुकणार असल्यामुळे ख्रिस वोक्स, स्टुअर्ट ब्रॉड यांच्यावर अतिरिक्त भार असेल. आयर्लंडची मदार प्रामुख्याने कर्णधार विल्यम्स पोर्टरफिल्ड, केव्हिन ओ’ब्राएन, पॉल स्टर्लिग या खेळाडूंवर असणार आहे. 
 

Web Title: Ireland’s Boyd Rankin to face England – the country he made Test debut for

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.