कोकण, पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या महापुरामुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले. या पुरात लोकांची उभी पिकं नष्ट झाली, घरं कोसळली, संसार उघड्यावर आले. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी तातडीची मदत तसेच दुरुस्ती व इतर दीर्घकालीन उपायांसाठी ११ हजार ५०० कोटी रुपये खर्चास आज राज्य मंत्रिमंडळाने नुकतीच मान्यता दिली. या पुरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक सेवाभावी संस्था, नेतेमंडळी, चित्रपट सृष्टीतील मान्यवर पुढे आले. त्यात आता इरफान पठाण व युसूफ पठाण या क्रिकेटपटूंचेही नाव जमा झाले आहे. पठाण बंधूंचे हे समाजकार्य जिकोनी फाऊंडेशनचे प्रमुखांनी जगासमोर आणले, त्यांनी ट्विटकरून याबाबत माहिती दिली आणि पठाण बंधूंचे आभार मानले. ( Former India cricketers Irfan Pathan and Yusuf Pathan have thus come forward to help the people in need)
इरफान व युसूफ हे पठाण बंधू यांनी कोरोना संकटात बरेच समाजकार्य केले. दक्षिण दिल्ली आणि वडोदरा येथील कोरोनाबाधित कुटुंबीयांना मोफत जेवण देण्याचं काम ते करत आहेत. मागच्या वर्षी या बंधूंनी जवळपास ९० हजार कुटुंबीयांच्या घरी रेशन पूरवण्याचं काम केलं आणि हे सर्व त्यांनी स्वखर्चातून करून दाखवले. क्रिकेटच्या मैदानावरील भावांची ही हिट जोडी मैदानाबाहेर सुपरहिट ठरली आहे. आता तर त्यांनी वडोदरा येथे ज्यांना ऑक्सिजन संच हवा आहे त्यांनाही तो मोफत देत आहेत. त्यांच्या वडिलांच्या फाऊंडेशनच्या मदतीनं हे समाजकार्य सुरू आहे.
त्यांनी राजेवाडी, जुईबुद्रुक, ओवळे, चांदवे खुर्द, अदिस्ते व सुतारकोर्ड या रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्याच्या लोकांच्या जीवनात महापूरानंतर वीजपुरवठा बंद झाल्यानंतर शेकडो लोकांच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी सौर दिवे देणगी म्हणून दिले. जिकोनी फौऊंडेशन तर्फे औषधे, कपडे, गाद्या, गॅस स्टोव्ह व इतर जीवनावश्यक वस्तू पुरविण्याचे मदतकार्य केले जात आहे.
आज जिकोनी फाऊंडेशननं ( Jikoni Foundation) पोस्ट केलेल्या व्हिडीओत अनेक गावकरी पठाण बंधूंचे आभार मानत आहेत. पूरामुळे गावातील वीज पुरवठा खंडीत झाला आणि त्यामुळे गावकऱ्यांना १५ दिवसांहून अधिक काळ अंधारात रहावे लागले. पठाण बंधू आणि त्यांच्या वडिलांच्या ट्रस्टने गावकऱ्यांना सोलार लाईट्सची मदत केली. त्यामुळे त्याच्या अंधारमय आयुष्यात वीजेची किरण आली.