Irfan Pathan: क्रिकेटर इरफान पठाण दुसऱ्यांदा झाला बाबा, पाहा बाप-लेकाचा फोटो

इरफानने इंस्टाग्राम अकाउंटवर बाळासोबतचा फोटो शेअर करुन चाहत्यांना खुशखबर दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 05:36 PM2021-12-28T17:36:55+5:302021-12-28T17:37:35+5:30

whatsapp join usJoin us
Irfan Pathan: Cricketer Irfan Pathan become father second time | Irfan Pathan: क्रिकेटर इरफान पठाण दुसऱ्यांदा झाला बाबा, पाहा बाप-लेकाचा फोटो

Irfan Pathan: क्रिकेटर इरफान पठाण दुसऱ्यांदा झाला बाबा, पाहा बाप-लेकाचा फोटो

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणच्या (Irfan Pathan) घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. इरफान आणि त्याची पत्नी सफा बेग यांनी आज (28 डिसेंबर) मुलाला जन्म दिला. इरफान पठाणने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. त्याने हॉस्पिटलमधील एक फोटो शेअर करून त्याच्या चाहत्यांना खुशखबर दिली आहे.

2016मध्ये झाले होते लग्न

इरफानने 2016 मध्ये दुबईतील प्रसिद्ध व्यवसायिक मिर्जा फारूख बेग यांची मुलगी सफा बेग हिच्याशी लग्न केले होते. त्या दोघांचे लग्न अतिशय कमी पाहुण्यांच्या उपस्थितीत 4 फेब्रुवारी 2016 मध्ये सौदी अरेबियातील पवित्र शहर असलेल्या मक्कामध्ये झाला होता. 19 डिसेंबरला 2016 त्यांनी पहिल्या मुलाला जन्म दिला. त्यानंतर सफा यांनी आज त्यांच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. 

मुलाचे नाव ठेवले सुलेमान

इरफानच्या पहिल्या मुलाचे नाव इम्रान असून, दुसऱ्या मुलाचे नाव सुलेमान ठेवले आहे. इरफानने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या मुलासोबतचा हॉस्पिटलमधील एक फोटो शेअर केला. तसेच, 'सफा आणि मी आमच्या बाळाचे सुलेमान खानचे स्वागत करतो. आई आणि बाळ सुखरूप आहेत.' असेही कॅप्शन त्याने दिले.

इरफानच्या नावे 301 विकेट

इरफान 2007 मध्ये टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियाचा सदस्य होता. त्या स्पर्धेत त्याने शानदार गोलंदाजी केली होती. पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने 16 धावांत 3 बळी घेतले होते. या कारणास्तव त्याची 'प्लेअर ऑफ द मॅच' म्हणून निवड करण्यात आली होती. संपूर्ण स्पर्धेत त्याने 14.90 च्या सरासरीने 10 बळी घेतले. इरफानने भारताकडून 29 कसोटी, 120 एकदिवसीय आणि 24 टी-20 सामने खेळला आहे. यामध्ये त्याने एकूण 301 विकेट घेतल्या आहेत.

Web Title: Irfan Pathan: Cricketer Irfan Pathan become father second time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.