इरफान पठाण हा टीम इंडियाच्या सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे, यात काही शंकाच नाही. आपल्या स्वींग गोलंदाजीच्या जोरावर त्यानं अनेक दिग्गज फलंदाजांना बाद केलं आहे. पाकिस्तानविरुद्ध त्यानं घेतलेली हॅटट्रिक आजची सर्वांच्या लक्षात असेलच. इरफाननं 2012मध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. इरफानला अजून संधी मिळायला हवी होती असे अनेकांचे मत होते. एका चाहत्यानं तीनही फॉरमॅटमधील इरफानच्या कामगिरीची आकडेवारी ट्विट केली आणि इरफानला संघातून बाहेर काढणे दुर्भाग्याचे आहे, असे म्हटले. या ट्विटमध्ये इरफाननं अखेरच्या आंतरराष्ट्रीय कसोटी, वन डे आणि ट्वेंटी-20 चांगली कामगिरी केल्याचे दिसत होते. त्यावर इरफाननं म्हटलं की,''दक्षिण आफ्रिकेविरुद्ध डेल स्टेन आणइ मॉर्कल सारख्या गोलंदाजांसमोर अष्टपैलू म्हणून नाबाद 63 धावा केल्या आणि तो अखेरचा सामना ठरला.'' त्यानंतर एका युजरनं इरफानवर टीका केली. तो म्हणाला, इरफानचा मूड खराब केला. तू अखेरच्या कसोटीत विकेट घेऊ शकला नाहीस आणि खराब गोलंदाजीमुळेच तुला संघाबाहेर केलं.'' त्यावर इरफाननं सडेतोड उत्तर दिलं. ''त्या सामन्यात विकेट न घेणारा मी एकटा गोलंदाज होतो. तुम्हाला हे कदाचित माहीत नसेल की, या सामन्याच्या आधीच्या लढतीत मला मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार मिळाला होता. तेव्हा कदाचित तू जन्मलापण नसशील.'' इरफाननं 29 कसोटी, 120 वन डे आणि 24 ट्वेंटी-20 सामन्यांत टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केलं आणि त्यानं अनुक्रमे 100, 173 व 28 विकेट्स घेतल्या आहेत. फलंदाजीत त्यानं कसोटीत 1105, वन डेत 1544 आणि ट्वेंटी-20त 172 धावा केल्या.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
भारतापाठोपाठ Sania Mirzaची पाकिस्तानलाही मदत; गरजूंसाठी केलं मोठं दान!
सुपर मॉडलसोबत झालाय इरफान पठाणचा विवाह; Social Mediaवर तिचे फोटो व्हायरल!
भारताचा क्रिकेटपटू उतरला रस्त्यावर; 10000 स्थलांतरितांना करतोय अन्न-पाणी वाटप
Shocking : जगातला खतरनाक योद्धा कोरोना व्हायरससमोर हतबल; कुटुंबातील 20 जणांना लागण!