नवी दिल्ली : १५ ऑगस्ट २०२२ रोजी देश आपला ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. भारत सरकारकडून स्वातंत्र्याची ७५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल देशभर अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या महोत्सवानिमित्त सरकारने 'हर घर तिरंगा' मोहिम (Har Ghar Tiranga) राबवली आहे. तसेच या मोहिमेअंतर्गत १३ ते १५ ऑगस्ट या दिवशी प्रत्येक घरावर तिरंगा फडकवून या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. भारत सरकारने केलेल्या या आवाहनाला देशभरातील अनेक सेलिब्रेटींसह सामान्य नागरिक उस्फुर्त प्रतिसाद देत आहेत. दरम्यान, या मोहिमेत भारतीय संघाचा माजी क्रिकेटर इरफान पठाननेही (Irfan Pathan) सहभाग नोंदवला आहे.
भारतीय संघाचा माजी गोलंदाज इरफान पठानने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो तिरंग्यासमोर उभा राहून या मोहिमेत सहभागी होण्याचे देशवासियांना आवाहन करत आहे. तसेच त्याने त्याच्या घरी तिरंगा लावून या मोहिमेत सहभाग नोंदवला आहे. पठानने व्हिडीओच्या माध्यमातून म्हटले, "तिरंगा मेरी जान, तिरंगा मेरी शान, तिरंगा माझा अभिमान आहे. चला तर मग 'हर घर तिरंगा' मोहिमेत सहभागी होऊन १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान प्रत्येक घरोघरी तिरंगा फडकवूया."
इरफान पठाणवर प्रेमाचा वर्षाव
इरफान पठाणच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून नेटकरी इरफानचे कौतुक करत आहेत. लक्षणीय बाब म्हणजे इरफान पठान लवकरच पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर दिसणार आहे. इरफान पठाण स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सप्टेंबरमध्ये लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहे. इरफान इंडियन महाराजाच्या संघासोबत भारतातील दिग्गज खेळाडूंसोबत मैदानात असेल. तसेच या संघाचे नेतृत्व भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याकडे असणार आहे.
इंडियन महाराजा संघ -
सौरव गांगुली ( कर्णधार), वीरेंद्र सेहवाग, मोहम्मद कैफ, युसूफ पठाण, एस बद्रीनाथ, इरफान पठाण, पार्थिव पटेल, स्टुअर्ट बिन्नी, एस श्रीसंथ, हरभजन सिंग, नमन ओझा, अशोक दिंडा, प्रग्यान ओझा, अजय जडेजा, आर पी सिंग, जोगिंदर सिंग, रितिंदर सिंग सोढी.
रेस्ट ऑफ वर्ल्डचा संघ -
इयॉन मॉर्गन ( कर्णधार), लेंडल सिमन्स, हर्षल गिब्स, जॅक कॅलिस, सनथ जयसूर्या, मॅट प्रायर, नॅथन मॅक्यलम, जाँटी ऱ्होड्स, मुथय्या मुरलीधरन, डेल स्टेन, हॅमिल्टन मसकात्झा, मश्रफे मोर्ताझा, असघर अफघान, मिचेल जॉन्सन, ब्रेट लीग, केव्हिन ओब्रायन, दिनेश रामदीन,
Web Title: Irfan Pathan has appealed to participate in the 'Har Ghar Tiranga' campaign by posting a video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.