IND vs SA: पर्थच्या वेगवान खेळपट्टीवर भारताने एक अतिरिक्त फलंदाज खेळवावा - इरफान पठाण 

टी-२० विश्वचषकात आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2022 04:11 PM2022-10-30T16:11:38+5:302022-10-30T16:13:13+5:30

whatsapp join usJoin us
Irfan Pathan said India should play an extra batsman against South Africa on a fast pitch in Perth today  | IND vs SA: पर्थच्या वेगवान खेळपट्टीवर भारताने एक अतिरिक्त फलंदाज खेळवावा - इरफान पठाण 

IND vs SA: पर्थच्या वेगवान खेळपट्टीवर भारताने एक अतिरिक्त फलंदाज खेळवावा - इरफान पठाण 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पर्थ : टी-२० विश्वचषकात आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना होणार आहे. भारतीय संघ ४ गुणांसह ग्रुप बीच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे, तर आफ्रिकेचा संघ ३ गुणांसह दुसऱ्या स्थानावर स्थित आहे. भारताने पाकिस्तान आणि नेदरलॅंड्स यांचा पराभव करून उपांत्य फेरीकडे कूच केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या सामन्यात पाकिस्तानने नेदरलॅंड्सचा पराभव करून विजयाचे खाते उघडले आहे. खरं तर लोकेश राहुलच्या जागी रिषभ पंतला खेळवणार नसल्याचे भारतीय संघाच्या प्रशिक्षकांनी स्पष्ट केले आहे. मात्र भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणने सामन्याच्या पूर्वसंध्येला संघाला एक सल्ला दिला आहे. 

दरम्यान, आज भारतीय संघाने पर्थच्या वेगवान खेळपट्टीवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एक अतिरिक्त फलंदाज खेळवला पाहिजे, असे इरफान पठाणने म्हटले आहे. साहजिकच अतिरिक्त फलंदाज खेळवला तर एका गोलंदाजाचा पत्ता कट होऊ शकतो. त्यामुळे भारतीय संघाची आजच्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हन कशी असेल हे पाहण्याजोगे असणार आहे. इरफान पठाणने सामन्याच्या पूर्वसंध्येला ट्विट करून सर्वांचेच लक्ष वेधले. आज भारताने एक अतिरिक्त फलंदाज खेळवावा असेही पठाणने म्हटले. 

रिषभ पंतला खेळवावे - कपिल देव
अशातच भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी दिनेश कार्तिकच्या जागी पंतला खेळवावे असे म्हटले आहे. रिषभ पंत आणि दिनेश कार्तिक यष्टीरक्षक फलंदाज आहेत. एबीपी या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना कपिल देव यांनी म्हटले, "मला असे म्हणायचे आहे की आमच्याकडे ऋषभ पंत असून आता भारताला त्याची गरज आहे. दिनेश कार्तिक हे काम पूर्ण करेल असे वाटले होते, परंतु यष्टिरक्षणातही विचार केला तर मला वाटते की भारताकडे हा डावखुरा असेल तर संघाने या पर्यायाचा विचार करायला हवा." 

टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ 
रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग.

राखीव खेळाडू - श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई. 

भारतीय संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील वेळापत्रक
२३ ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, १.३० वाजल्यापासून, मेलबर्न
२७ ऑक्टोबर - भारत वि. A गटातील उपविजेता, १२.३० वाजल्यापासून, सिडनी
३० ऑक्टोबर - भारत वि. दक्षिण आफ्रिका, ४.३० वाजल्यापासून, पर्थ
२ नोव्हेंबर - भारत. वि. बांगलादेश, १.३० वाजल्यापासून, एडलेड
६ नोव्हेंबर - भारत वि. B गटातील विजेता, १.३० वाजल्यापासून, मेलबर्न
१३ नोव्हेंबरला अंतिम सामना 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

Web Title: Irfan Pathan said India should play an extra batsman against South Africa on a fast pitch in Perth today 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.