कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेशी देश संघर्ष करत असताना इरफान पठाण, वीरेंद्र सेहवाग आणि शिखर धवन हे क्रिकेटपटू मदतीला पुढे आले आहेत. इरफान आणि त्याचा भाऊ युसूफ पठाण हे मागच्या लॉकडाऊनपासून या व्हायरसविरुद्धच्या लढ्यात समाजकार्य करत आहेत. शनिवारी इरफाननं सोशल मीडियावरून चॅरिटीसाठी गोळा केलेली संपूर्ण रक्कम कोरोना लढ्यासाठी दान करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाचा गब्बर यानं ऑक्सिजन संच दान केले तर वीरूनं त्याच्या फाऊंडेशनच्या मदतीनं मागील एक महिन्यात 51 हजार कोरोनाबाधित लोकांना मोफत जेवण पुरवले आहे.
इरफान व युसूफ पठाण यांचं समाजकार्य
इरफान व युसूप ही पठाण बंधूंची जोडी या काळात अनेकांसाठी खऱ्या अर्थानं संकटमोचक ठरली. मागील लॉकडाऊनमध्ये भरभरून मदत केल्यानंतर ही जोडी पुन्हा मदतीसाठी सक्रीय झाली आहे. वडोदरा पाठोपाठ आता ही जोडी दक्षिण दिल्लीत कोरोना बाधित व त्यांच्या कुटुंबीयांना मोफत जेवण देण्याच काम करत आहेत
गतवर्षी लॉकडाऊनच्या काळात गरजूंसाठी पठाण बंधूंनी 10 किलो तांदूळ आणि 700 किलो बटाटे दान करण्याचा निर्णय घेतला होता. शिवाय त्यांनी वडोदरा येथील विविध हॉस्पिटल्सनानं PPE किट्स व मास्कचे वाटपही केलं होतं. आता कोरोना संकट पुन्हा डोकं वर काढत असताना या दोघांनी वडिलांच्या नावानं सुरू असलेल्या Mehmoodkhan S Pathan Public Charitable Trustच्या माध्यमातून वडोदरा येथील कोरोना रुग्णांना मोफत अन्न पुरवण्याचे काम सुरू केले आहे.
क्रिकेट अकादमी ऑफ पठाण्स ( Cricket Academy of Pathans ) च्या माध्यमातून दक्षिण दिल्लीतील कोरोना बाधितांना व त्यांच्या कुटुंबीयांना मोफत जेवण देणार आहेत.
शिखर धवननं दिले ऑक्सिजन संच
वीरेंद्र सेहवाग फाऊंडेनचे समाजकार्य
Web Title: Irfan Pathan, Shikhar Dhawan and Virender Sehwag help during covid-19 pandamic
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.