Road Safety World Series - इरफान पठाण ( Irfan Pathan ) व नमन ओझा ( Naman Ojha) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर इंडिया लीजंड्स ( India Legends) संघाने रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केले. इंडिया लीजंड्सने उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया लीजंड्स ( Australia Legends) वर ५ विकेट्स राखून विजय मिळवला. काल पावसामुळे हा सामना स्थगित करावा लागला होता आणि तो आज पूर्ण झाला. इरफानने ५ षटकार व १ चौकार खेचताना १२ चेंडूंत नाबाद ३९ धावा करून ४ चेंडू राखून इंडिया लीजंड्सचा विजय पक्का केला.
इंडिया लीजंड्स संघाचा कर्णधार सचिन तेंडुलकर याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार शेन वॉटसन व अॅलेक्स डूलान यांनी पहिल्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी केली. राहुल शर्माने ही भागीदारी तोडली अन् २१ चेंडूंत ३० धावा करणाऱ्या वॉटसनचा झेल रैनाने टिपला. त्यानंतर युसूफ पठाणच्या गोलंदाजीवर डूलान ( ३५) यष्टीचीत झाला. बेन डंक भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत होता. १६व्या षटकात अभिमन्य मिथूनच्या गोलंदाजीवर डंकने पॉईंटच्या दिशेने फटका मारला. तिथे उभ्या असलेल्या सुरेश रैनाने हवेत झेप घेत चेंडू पकडला अन् डंकला माघारी जाण्यास भाग पाडले. डंकने २६ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ४६ धावा केल्या. ऑस्ट्रेलिया लीजंड्सने १७ षटकांत ५ बाद १३६ धावा केल्या होत्या.
कॅमेरून व्हाईटन १८ चेंडूंत नाबाद ३० धावा करताना ऑस्ट्रेलियाला ५ बाद १७१ धावांपर्यंत मजल मारून दिली.
प्रत्युत्तरात सचिन तेंडुलकर ( १०), सुरेश रैना ( ११), युवराज सिंग (१८), स्टुअर्ट बिन्नी ( २) व युसूफ पठाण ( १) हे आज अपयशी ठरले. शेन वॉटसनने दोन विकेट्स घेतल्या. सलामीवीर नमन ओझा व इरफान पठाण यांनी निर्णायक खेळी केली. नमनने६२ चेंडूंत ७ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ९० धावा केल्या. तर इरफानने ३०८ च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी करताना १२ चेंडूंत २ चौकार व ४ षटकार खेचून नाबाद ३७ धावा करून संघाला ४ चेंडू राखून विजय मिळवून दिला.
Web Title: Irfan Pathan, the finisher of India Legends, 39* runs from just 12 balls including 4 sixes and 2 four, India Legends won by 5 wickets against Australia Legends to reach finals of Road Safety World Series
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.