भारतातील कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 25,149 इतकी झाली असून 3728 जणांना आपले प्राण गमवावे लागले. 51,824 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी देशातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. तरीही अजूनही लोकांकडून नियमांचं काटेकोर पालन होताना पाहायला मिळत नाही. सोशल डिस्टन्सिंगचा अनेक ठिकाणी फज्जा उडाल्याचं चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाणनं मुस्लीम बांधवांना ईद-उल-फित्र घरीच साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. त्यानं इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
ईद-उल-फित्र हा सण सर्वांच्या भेटीगाठी घेऊन साजरा केला जातो. मशीदीत एकत्र येऊन मोठ्या संख्येनं मुस्लीम बांधव तो साजरा करतात, परंतु कोरोना व्हायरसमुळे यंदा घरीच हा सण साजरा करण्याचं आवाहन पठाणकडून करण्यात आलं.
इरफान पठाणनं नुकतंच गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. कोरोनावर कशी मात करता येईल, याबद्दल पठाणनं त्याची काही मतं व्यक्त केली. ''वडोदराचे आयुक्त आणि जिल्हाधिकारी हे चांगलं काम करत आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी लोकांनीही एकमेकांना सहकार्य करावे. या संकटात एकमेकांना मदत करण्यासाठी पुढे यावं,'' असे मत पठाणनं व्यक्त केलं होतं.View this post on Instagram#prayer #stayhome #lockdown #coronavirus
A post shared by Irfan Pathan (@irfanpathan_official) on
Emotional : चार दिवसांपूर्वी झालेलं वडिलांचं निधन, तरीही मैदानावर उतरून सचिननं ठोकलं शतक!
15 वर्षीय ज्योतिनं जिंकलं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष्यांच्या मुलीचं मन