Irfan Pathan's befitting reply to Pakistan PM - ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाला उपांत्य फेरीत इंग्लंडकडून १० विकेट्सने पराभव पत्करावा लागला. त्यानंतर भारतीय संघाला पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरिफ ( Pakistan Prime Minister Shehbaz Sharif) यांच्यापासून अनेकांनी ट्रोल केले. शरिफ यांनी तर भारतीय संघावर टीका करताना जखमेवर मीठ चोळण्यांचे काम केले. त्यांनी मागील वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तानकडून झालेल्या पराभवाची आठवण करून देताना टीम इंडियाला ट्रोल केले. पण, यावरून भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण ( Irfan Pathan) याने पाकिस्तानच्या पंतप्रधानांना सुनावले.
विराट कोहली ( ५०) व हार्दिक पांड्या ( ६३*) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने ५ बाद १६८ धावा केल्या. जोस बटलर व ॲलेक्स हेल्स यांनी भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. इंग्लंडने १६ षटकांत बिनबाद १७० धावा करून दणदणित विजय मिळवला. भारतावर १० विकेट्स राखून विजय मिलवताना बटलर व हेल्सने वर्ल्ड कप इतिहासातील सर्वोत्तम भागीदारीची नोंद केली. बटलरने ४९ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांसह ८० व हेल्सने ४७ चेंडूंत ४ चौकार व ७ षटकारांच्या मदतीने नाबाद ८६ केल्या.
या पराभवानंतर पाकिस्तानचे पंतप्रधानांनी ट्विट केले की, म्हणजे येत्या रविवारी, बिनबाद १५० विरुद्ध बिनबाद १७० ( 152/0 vs 170/0 ) असा सामना होणार तर...
यावरून इरफान पठाणने सडेतोड उत्तर दिले, त्याने पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या ट्विटला उत्तर देताना लिहिले की, तुमच्यात आणि आमच्यात एकच मुख्य फरक आहे. आम्ही आपल्या आनंदाने आनंदी होतो, तर तुम्ही दुसऱ्यांच्या दुःखावर आनंदी होता. त्यामुळे स्वतःच्या देशाला चांगल बनवण्यावर लक्ष द्या.