Join us  

अफागाणिस्तानने पाकिस्तानला लोळवल्यानंतर इरफान पठाणचा रशिद खानसोबत तुफान डान्स, व्हिडीओ व्हायरल

ICC CWC 2023, Pak Vs AFG: अफगाणिस्तानच्या या विजयानंतर मैदानात उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनीही अफगाणी खेळाडूंचं कौतुक केलं. दरम्यान, या सामन्याचं समालोचन करणाऱ्या इरफान पठाणलाही अफगाणिस्तानच्या खेळाडूंचं कौतुक करण्याचा मोह आवरला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 11:41 PM

Open in App

यंदाच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये आणखी एका सनसनाटी विजयाची नोंद करताना आज अफगाणिस्तानने पाकिस्तानचा ८ विकेट्स राखून पराभव केला. पाकिस्तानने दिलेलं २८३ धावांचं आव्हान अफगाणी फलंदाजांनी आक्रमक खेळ करत सहजपणे पार केलं. अफगाणिस्तानच्या या विजयानंतर मैदानात उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनीही अफगाणी खेळाडूंचं कौतुक केलं. दरम्यान, या सामन्याचं समालोचन करणाऱ्या इरफान पठाणलाही अफगाणिस्तानच्या खेळाडूंचं कौतुक करण्याचा मोह आवरला नाही. इरफान पठाणने त्यांच्या खेळाचं कौतुक करताना रशिद खानसोबत मैदानातच डान्स केला. या डान्सचा व्हिडीओ आता तुफान व्हायरल होत आहे.

पाकिस्तानने दिलेल्या आव्हानाचा एक षटक राखून फडशा पाडल्यानंतर अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी एकच जल्लोश केला. त्यांनी मैदानाला फेरी मारत प्रेक्षकांच्या अभिवादनाचा स्वीकार केला. दरम्यान, या सामन्याचं समालोचन करणाऱ्या इरफान पठाणची रशिद खानशी गाठ पडली. तेव्हा अफगाणिस्तानच्या विजयाबाबत आनंद व्यक्त करत इरफान पठानने रशिद खानची गळाभेट घेतली. तसेच संघातील खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक केले. तसेच यावेळी इरफान पठानने रशिद खानसोबत जबरदस्त डान्सही केला. 

दरम्यान, या विजयासह अफगाणिस्तानने गुणतालिकेत मोठी उलथापालथ घडवली आहे. अफगाणिस्तानचा संघ पाच सामन्यातील दोन विजय आणि चार गुणांसह सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. तर पाकिस्तान पाच सामन्यातील दोन विजयांसह पाचव्या क्रमांकावर आहे. 

टॅग्स :इरफान पठाणअफगाणिस्तानवन डे वर्ल्ड कप