देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे... दररोज साडेतीन लाख नवीन कोरोना रुग्णांची भर पडत आहे... आरोग्य यंत्रणेवर पुन्हा एकदा मोठा ताण पडत आहे... ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे लोकांना जीव गमवावा लागत आहे.. अशात पुन्हा एकदा अनेक लोकं मदतीसाठी पुढे येत आहेत. ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज पॅट कमिन्सन यानं पंतप्रधान फंडात ३० लाखांची मदत केली. ऑसींचा माजी गोलंदाज ब्रेट ली यानंही ४३ लाख भारतातील विविध हॉस्पिटल्संना ऑक्सिजन पुरवठ्यासाठी दान केले. अशात भारतीय खेळाडूही मागे नाहीत. शेल्डन जॅक्सन यानंही गौतम गंभीर फाऊंडेशनला मदत जाहीर करून इतरांनाही पुढाकार घेण्यास सांगितले. मागच्यावर्षी लॉकडाऊनच्या काळात गरीबांना मदत करणारे पठाण बंधू इरफान व युसूफ यांनी पुन्हा मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. चेन्नई सुपर किंग्सचा ओपनर राजस्थान रॉयल्सकडून खेळणार; अजिंक्य रहाणेही RRमध्ये परतणार?
भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी भावडांपैकी ही एक जोडी. त्यांचे वडील २५० रुपये रोजंदारीवर काम करायचे. मुलांचे क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते जूनी बुटं विकत घ्यायचे आणि त्यांना शिलाई मारून मुलांना द्यायचे. युसूफनं भारताकडून ५७ वन डे व २२ ट्वेंटी-२० सामने खेळले. वन डे त त्यानं दोन शतकं व ३ अर्धशतकांसह ८१० धावा केल्या. शिवाय ३३ विकेट्स घेतल्या. इरफाननं २९ कसोटीत ११०५ धावा आणि १०० विकेट्स घेतल्या. १२० वन डे व २४ ट्वेंटी-20 सामन्यांत त्याच्या नावावर अनुक्रमे १५४४ धावा व १७३ विकेट्स आणि १७२ धावा व २८ विकेट्स आहेत. वडिलांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला अन् भारतीय खेळाडूनं घेतला आयपीएल सोडण्याचा निर्णय
गरीबीतून वर आलेल्या पठाण कुटुंबीयांनी समाजाप्रती असलेली जबाबदारी योग्य रितीनं पार पाडली आहे. गतवर्षी लॉकडाऊनच्या काळात गरजूंसाठी पठाण बंधूंनी 10 किलो तांदूळ आणि 700 किलो बटाटे दान करण्याचा निर्णय घेतला होता. शिवाय त्यांनी वडोदरा येथील विविध हॉस्पिटल्सनानं PPE किट्स व मास्कचे वाटपही केलं होतं. आता कोरोना संकट पुन्हा डोकं वर काढत असताना या दोघांनी वडिलांच्या नावानं सुरू असलेल्या Mehmoodkhan S Pathan Public Charitable Trustच्या माध्यमातून वडोदरा येथील कोरोना रुग्णांना मोफत अन्न पुरवण्याचा वसा उचलला आहे. त्यांनी लोकांना या संकट काळात धीर न सोडण्याचं आवाहन केलं आहे आणि एकमेकांना मदत करा असा सल्लाही दिला आहे.
Web Title: Irfan & Yusuf Pathan provide free food kit for those affected with covid-19 in vadodara, share helpline number
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.