Join us  

Irrfan Khan Passed away: त्या वेदना मी समजू शकतो..., इरफानच्या जाण्यानं भावुक झाला Yuvraj Singh

दीर्घकाळापासून कॅन्सरशी झुंज देत असलेल्या बॉलिवूड दिग्गज अभिनेता इरफान खान याचे आज निधन झाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 2:49 PM

Open in App

दीर्घकाळापासून कॅन्सरशी झुंज देत असलेल्या बॉलिवूड दिग्गज अभिनेता इरफान खान याचे आज निधन झाले. काल अचानक तब्येत बिघडल्यामुळे इरफानला कोकिलाबेन रुग्णालयात आयसीयूमध्ये भरती करण्यात आले  होते. इरफान लवकर बरा व्हावा, यासाठी चाहते प्रार्थना करत असताना त्याच्या मृत्यूची बातमी आली आणि चाहते शोकसागरात बुडाले. बॉलिवूडमध्येही शोककळा पसरली. क्रीडा विश्वातूनही त्याला श्रद्धांजली वाहिली जात आहे. इरफानच्या जाण्यानं भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग भावुक झाला.

दोन वर्षांपूर्वी 2018 मध्ये इरफानने त्याच्या आजाराबद्दल आपल्या फॅन्सना सांगितले होते. इरफानला न्यूरो इंडोक्राइन ट्यूमर हा आजार होता. इरफानच्या आजारावर लंडनमध्ये उपचार सुरु होते. दीर्घकाळ उपचार घेतल्यानंतर सप्टेंबर 2019 मध्ये इरफान भारतात परतला होता. यानंतर त्याने ‘अंग्रेजी मीडियम’ या सिनेमाचे शूटींग सुरू केले होते. नुकताच हा सिनेमा रिलीज झाला होता़ हा त्याचा शेवटचा चित्रपट ठरला.

काही दिवसांपूर्वा इरफानची आई सईदा बेगम यांचे जयपूरमध्ये निधन झाले होते. मात्र लॉकडाऊन असल्यामुळे इरफानला जयपूरमध्ये पोहोचू शकला नव्हता. त्यानंतर काल इरफानची तब्येत बिघडली आणि त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले. इरफानच्या निधनानंतर युवीनं श्रद्धांजली वाहिली.

''मला तो प्रवास माहीत आहे, मला त्या वेदना माहीत आहेत आणि मला हेही माहित्येय की तू अखेरपर्यंत संघर्ष केलास. या आजारातून काही जण वाचतात, काही नाही. तुझ्या आत्म्याला शांती मिळो,''असं युवीनं ट्विट केले. युवीलाही 2011मध्ये कॅन्सर झाला होता. त्यानंतर योग्य उपचार आणि अथक परिश्रम घेत युवीनं कॅन्सरवर मात केली आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले.  

इरफान खान यांचे काम अमर राहील, क्रीडा विश्वानं वाहिली श्रद्धांजली

इरफान गेल्या वर्षी उपचारामुळे झाला होता पूर्णपणे बरा, या आजाराला दिली होती झुंज

मै आपके साथ हूँ भी और नहीं भी...! इरफानचे ते शब्द ठरले अखेरचे...!! 

नाही राहिला माझा प्रिय मित्र...सुजीत सरकारने व्यक्त केली खंत, बॉलिवूडही हळहळलं

 

टॅग्स :इरफान खानयुवराज सिंग