दीर्घकाळापासून कॅन्सरशी झुंज देत असलेल्या बॉलिवूड दिग्गज अभिनेता इरफान खान याचे आज निधन झाले. काल अचानक तब्येत बिघडल्यामुळे इरफानला कोकिलाबेन रुग्णालयात आयसीयूमध्ये भरती करण्यात आले होते. इरफान लवकर बरा व्हावा, यासाठी चाहते प्रार्थना करत असताना त्याच्या मृत्यूची बातमी आली आणि चाहते शोकसागरात बुडाले. बॉलिवूडमध्येही शोककळा पसरली. क्रीडा विश्वातूनही त्याला श्रद्धांजली वाहिली जात आहे.
इरफान खान यांचे काम अमर राहील, क्रीडा विश्वानं वाहिली श्रद्धांजली
इरफाननं केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. अशा या हरहुन्नरी अभिनेत्याला बालपणी क्रिकेटपटू बनायचे होते. राजस्थान येथे जन्मलेल्या इरफानला क्रिकेटची ओढ होती आणि घराशेजारील चौगान स्टेडियमवर जाऊन तो क्रिकेट खेळायचा. त्याला शाळेत जाण्याऐवजी क्रिकेटची प्रॅक्टीस करणे अधिक आवडायचे.
काही वृत्तांनुसार तो चांगला क्रिकेटपटू होता आणि सी के नायुडू चषक स्पर्धेसाठी त्याची निवड निश्चित मानली जात होती. पण, गरीबी आणि कुटुंबीयांच्या विरोधामुळे इरफानचे क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. इरफाननं टेलिग्राफला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की,''मला क्रिकेटपटू बनयाचे होते. मी अष्टपैलू खेळाडू होतो आणि माझ्या संघातील सर्वात युवा खेळाडू होते. मला क्रिकेटपटू म्हणूनच कारकीर्द घडवायची होती. सी के नायुडू स्पर्धेसाठी माझी निवड झाली होती आणि तेव्हा मला पैसे हवे होते. त्यासाठी कोणाला विचारावे हे मला तेव्हा कळले नाही. मला 600 रुपये हवे होते आणि तेही मी मागू शकलो नाही.''
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यानं नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथे अर्ज केला. त्याला पहिल्याच प्रयत्नात प्रवेश मिळाला. प्रवेश मिळवण्यासाठी इरफानला खोटं बोलावं लागलं होतं. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथे प्रवेश मिळवण्यासाठी 10 नाटकांचा अनुभव असणे महत्त्वाचे होते आणि इरफानकडे तो अनुभव नव्हता.
इरफान गेल्या वर्षी उपचारामुळे झाला होता पूर्णपणे बरा, या आजाराला दिली होती झुंज
मै आपके साथ हूँ भी और नहीं भी...! इरफानचे ते शब्द ठरले अखेरचे...!!
नाही राहिला माझा प्रिय मित्र...सुजीत सरकारने व्यक्त केली खंत, बॉलिवूडही हळहळलं